Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Surajya Digital
Last updated: 2022/06/15 at 9:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

बार्शी : राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे प्राणघातक हल्ला  प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक विजय राऊत, दिपक धावारे, रणजित चांदणे या तिघांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी फेटाळला. Former corporator and three others’ pre-arrest bail rejected in Nagesh Akkalkote murder case barshi

याप्रकरणी फिर्यादी अक्कलकोटे यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजीत कुलकर्णी, अ‍ॅड. विकास जाधव, अ‍ॅड. अक्षय काशीद यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. राजश्री कदम यांनी बाजु मांडली

दि. १ ऑगस्ट २०१४ रोजी अक्कलकोटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८४/२०१४ अन्वये भा.द.वि. १४३, १४७, १४८, ३०७, ३२९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४९ व आर्म अ‍ॅक्ट २५ (२) प्रमाणे विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तपासाअंती तत्कालीन तपास अधिकारी सालार चाऊस यांनी विजय राऊत, दिपक धावारे, रणजित चांदणे यांची नावे सी.आर.पी.सी. १६९ प्रमाणे वगळण्याचा अहवाल व इतर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयाकडे सादर केले होते. त्यास अक्कलकोटे यांनी आव्हान दिल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयश्री राऊत यांनी १६९ चा अहवाल फेटाळुन आरोपी विरोधात प्रोसेस इश्युचे आदेश पारित केले होते.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/561867918824275/

 

याविरोधात या तिघांनी प्रथम सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र प्रोसेस इश्यू आदेश कायम राहिला. त्यामुळे या तिघांनी सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी सत्र न्यायाधीश जगदाळे यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अभियोग पक्षाच्यावतीने तिघांच्या अटकेची गरज असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

 

□ घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

अक्कलकोट :  थोडक्यात हकीकत, आरोपी विरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाणे, सोलापूर येथे भा. द. वि. कलम 354, 452 सह 34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीने आपसातील  पूर्व वैमनस्य व वादास शह देणेचे उद्देशाने आरोपी व त्याच्या कुटुंबीयांना जाणून बुजून सदर खोट्या गुन्ह्यात गुंतविले आहे. आपसातील पूर्वीचा दिवाणी दावा न्यायप्रविष्ट असताना देखील हेतुपुरस्सर केवळ मानसिक  त्रास होण्याच्या उद्देशाने व विलंबाने हा दावा दाखल करण्यात आला होता, असा युक्तिवाद  न्यायालयासमोर आरोपीच्या वकिलाने
 केला.
हा युक्तिवाद ग्राह्य धरून  न्यायालयाने आरोपी अशोक उपाध्ये, निर्मला उपाध्ये, स्वप्नील उपाध्ये, शिल्पा उपाध्ये यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपी तर्फे ॲड. मनोज  गुंडे, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. वैजयंती एस पाटील यांनी काम पाहिले.

https://www.facebook.com/109399567404448/posts/561045935573140/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Former #corporator #three #pre-arrest #bail #rejected #NageshAkkalkote #murder #case #barshi, #नागेशअक्कलकोटे #प्राणघातक #हल्ला #प्रकरण #बार्शी #माजी #नगरसेवक #अटकपूर्व #जामीन #फेटाळला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात एक कोटी ३१ लाखाच्या गुटख्याची होळी
Next Article घरगुती गॅस कनेक्शन आजपासून 750 रुपयांनी महाग; आता मोजावे लागणार 2200 रूपये

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?