□ एमआयडीसीतील येथील घटना
सोलापूर – कारखान्याच्या आवारातच मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी (अक्कलकोट रोड) येथील ताटी कारखाना येथे काल बुधवारी (ता. 15) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. Suicide by hanging of owner in factory premises in Solapur
प्रवीणकुमार विठ्ठल गंजी (वय ३० रा. जुना कुंभारी नाका) असे मयत झालेल्या कारखानदारांचे नाव आहे. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह कारखान्यातील छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन खाली पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला.
यासंबंधी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रवीणकुमार गंजी हा एमआयडीसी येथील ईआरटी चौकाजवळ असलेला ताटी यांचा कारखाना (लुम) भाड्याने चालवण्यासाठी घेतला होता. काल बुधवारी सुट्टी असल्याने कारखाना बंद होता. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरातील लोकांनी कारखान्यात जाऊन पाहणी केली असता, त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खाली जमिनीवर पडलेल्या आढळून आला.
याची माहिती मिळताच एमआयडीसीच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालकडे पाठवून दिला. मयत प्रवीणकुमार हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजले नाही.हवालदार बागवान पूढील करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/562239768787090/
● मंगळवेढा येथे मोटारीच्या धडकेने पादचारी तरुण ठार
सोलापूर – मंगळवेढा येथे मोटारीच्या धडकेने गंभीर जखमी झालेला वजीर सरदार मदारी (वय २३ रा. मंगळवेढा) हा तरुण सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज गुरुवारी (ता.16) सकाळी मरण पावला. तो मंगळवारी रात्री मंगळवेढा मार्केट यार्ड येथून पायी घराकडे निघाला होता. त्यावेळी पाठीमागून मोटार धडकल्याने तो जखमी झाला होता. त्याला मंगळवेढा आणि पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
● वडाळा येथे वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या अशोक बळीराम कांबळे (वय ७०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरातील छताच्या लाकडी वाशाला केबलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार मुल्ला पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561974198813647/