मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र ( इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या (17 जून) जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. Tenth result tomorrow afternoon
उद्या शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/562009865476747/
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, याबाबत बोर्डानं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. तर गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं.
या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
गुणपडताळणीसाठी सोमवार, दिनांक 20 जून 2022 ते बुधवार, दिनांक 29 जून 2022 पर्यंत व छायाप्रतीसाठी सोमवार, दिनांक 20 जून 2022 ते शनिवार, दिनांक 9 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561867918824275/