Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, भाजपा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, भाजपा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल 

Surajya Digital
Last updated: 2022/06/17 at 10:07 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ काश्मीरी पंडितांबाबतचे वक्तव्य भोवले, साई पल्लवीविरूद्ध तक्रार

बार्शी  : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी बार्शीतील भाजपा कार्यकर्ते युवराज चंद्रकांत ढगे (रा. प्रसन्नदाता मार्ग, बार्शी) वर बार्शी शहर पोलीस ठाण्यात भादंवि तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. Offensive post about Chakankar, chairperson of women’s commission, crime against BJP activist

येथील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दरम्यान, युवराज ढगेस अटक करण्यात आले नंतर जामिनावर सुटका झाली. दि. १४ रोजी वटपौर्णिमा असल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी समाजमाध्यमावर मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही, अशी पोस्ट टाकली होती.

त्यावर ‘आईच्या गावात अन १२ च्या भावात’ या समाजमाध्यमावरील अकाऊंटवरून चाकणकर यांनी टाकलेली पोस्ट कॉपी करून त्यावर त्यांनी चाकणकर यांच्या पोस्टबद्दल आपले काय मत आहे? असे विचारले होते. तसेच चाकणकर यांनी समाजाला सत्यवानाची सावित्री कळली, पण जोतिबाची सावित्री कळलीच नाही असे वक्तव्य केलेवर आईच्या गावात अन १२ च्या भावात या समाजमाध्यमावरील अकाऊंटवर पटतय का ? असे विचारण्यात आले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

यावर युवराज ढगेने आक्षेपार्ह उत्तर दिले. सदर पोस्ट व उत्तराचा स्क्रीन शॉट राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे बार्शी शहराध्यक्ष इब्राहिम शेख यांनी फिर्यादी शिवपुरे यांना दाखविला. त्यानंतर शिवपुरे यांनी चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी युवराज ढगे विरोधात तक्रार दिली.

दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे पुढील तपास करीत आहेत.

 

□ काश्मीरी पंडितांबाबतचे वक्तव्य भोवले, साई पल्लवीविरूद्ध तक्रार

 

काश्मीरी पंडितांबाबत केलेल्या वक्तव्यावरून दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री साई पल्लवी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या नेत्यांनी हैद्राबादच्या सुलतान बाजार पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. ‘विराट पर्वम’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई पल्लवीने काश्मीरी पंडीतांवर झालेल्या आत्याचारांची तुलना ‘गायीची तस्करी आणि मॉब लिंचिंगशी केली होती.

 

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #barshi, #Offensive #post #rupaliChakankar #chairperson #women's #commission #crime #BJP #activist, #बार्शी, #महिला #आयोग #अध्यक्षा #रूपालीचाकणकर #आक्षेपार्ह #पोस्ट #भाजपा #कार्यकर्त्या #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्या दुपारी दहावीचा निकाल
Next Article प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांना अटक

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?