Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांना अटक

Surajya Digital
Last updated: 2022/06/17 at 12:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ बोराळे येथे दगड काठीने मारहाण वृद्ध गंभीर जखमी□ दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून भावावर वस्तऱ्याने वारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू□ अपघातामधील वृद्ध महिलेचा मृत्यू

सोलापूर – तक्रारी अर्जाची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यास अर्वाच्य शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केल्याची घटना वटवटे (ता.मोहोळ) येथील जकराया शुगर कारखाना जवळ घडली. या प्रकरणात कामतीच्या पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. Insult to Pollution Control Board officials; Three arrested

यासंदर्भात संजय ताराचंद ननावरे या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. कारखाना परिसरातील शेतात दूषित पाणी येत असल्याची तक्रार नारायण गुंड यांनी केली होती. त्या तक्रारी अर्जाचे पाहणी करणसाठी ननवरे हे मंगळवारी (ता .14) दुपारच्या सुमारास गेले होते.

त्यावेळी नारायण गुंड त्यांचा भाऊ हरी शिवाजी गुंड आणि लहु पंढरी जाधव (सर्व रा.येणकी ता.मोहोळ) या तिघांनी त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून कामात अडथळा केला होता. पुढील तपास सहाय्यक फौजदार दुधे हे करीत आहेत.

 

□ बोराळे येथे दगड काठीने मारहाण वृद्ध गंभीर जखमी

 

बोराळे (ता.मंगळवेढा) येथे भावकीतील भांडणातून काठी आणि दगडाने केलेल्या मारहाणीत सिद्धेश्वर मलसिद्ध कोठे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले. ही घटना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना बेशुद्धावस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अशोक (मुलगा) यांनी दाखल केले. त्यांना हनुमंत मलसिद्ध कोठे आणि शांताबाई हनुमंत कोठे या दोघांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

□ दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून भावावर वस्तऱ्याने वार

 

सोलापूर – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सख्ख्या भावाला वस्तऱ्याने वार करून जखमी करण्यात आले. ही घटना लकी चौकातील हेअर कटिंग दुकानात मंगळवारी (ता.14) सकाळी घडली.

राकेश अशोक सिंदगीकर (वय ४५ रा. माशाळ वस्ती) असे जखमी झालेल्या  दुकानदाराचे नाव आहे. त्यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ राजेश सिंदगीकर याच्याविरुद्ध फौजदार चावडीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राकेश सिंदगीकर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या दुकानात बसले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

त्या वेळी त्यांचा भाऊ राजेश हा मद्यप्राशन करून दुकानात आला. आणि पैसे मागू लागला. पैसे नाही म्हणताच त्याने दुकानातील केस कापण्याचा वस्तरा घेऊन त्यांच्या गालावर आणि हातावर वार करून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत .

□ विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

 

देगाव वाळूज (ता.मोहोळ) येथे स्वतःच्या शेतात विष प्राशन केलेले गोकुळ विश्वनाथ अतकरे (वय ६०) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज मंगळवारी (ता. 14) दुपारी मरण पावले. त्यांनी १० जून रोजी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात विष प्राशन केले होते. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात शहाजी (भाऊ) यांनी दाखल केले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□ अपघातामधील वृद्ध महिलेचा मृत्यू

 

उस्मानाबाद येथील दर्गा रोडवर राहणाऱ्या सुगराबी गफूरर बागवान (वय ७५) या वृद्ध महिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना सोमवारी (ता. 13) सायंकाळी मरण पावल्या. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्या घराजवळ पायी फिरत होत्या. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेने त्या जखमी झाल्या. त्यांना उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी नोंद पोलिसात झाली आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Insult #Pollution #Control #Board #officials #Three #arrested #crime #solapur, #प्रदूषण #मंडळ #अधिकारी #शिवीगाळ #तिघांना #अटक #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, भाजपा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल 
Next Article जुन्या जोडीदाराने खोतांची कळा खाल्ली, चारचौघांत सदाभाऊंची अब्रू काढली

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?