¤ आधी हॉटेलची द्या उधारी, नाही तर फिरा माघारी
¤ सांगोल्यात पंचायती राज समितीची झाली पंचायत
Old couple eats donkey keys, defames Sadabhau, Sadabhau’s reputation was tarnished in all fours, hotel borrowing sangola
सोलापूर : “मेलं तरी कुणाच्या उधारीत मरू नये’, असं पूर्वीची जुनी लोकं सांगायची. कारण उधारी कुठं निघेल आणि कुठं मान खाली घालावी लागेल, याचा काही नेम नसतो. म्हणूनच ज्यानं उधारी ठेवली आहे तो ज्याच्याकडं उधारी ठेवली आहे; त्याच्या समोरून जाणंसुध्दा टाळतो. समोरासमोर आलं की तो उधारी विचारणारच आणि चारचौघांत इज्जतीचा भाजीपाला होणारच, हे ठरलेलं असतं. असाच प्रकार गुरुवारी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या वाट्याला आला. त्यांच्याच जुन्या जोडीदारानं उधारीवरून त्यांची पार कळा खाल्ली आणि चारचौघात अब्रू काढली. आधी हॉटेलची उधारी द्या नाही तर फिरा माघारी’ असा पवित्रा घेतल्यामुळे सदाभाऊंसह लोकांची पंचायत करण्यासाठी सांगोल्यात गेलेल्या पंचायती राज समितीचीच पंचायत झाली.
पंचायती राज समितीचे सदस्य असणारे आ. सदाभाऊ खोत हे समितीमधील इतर सदस्य आ. अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे यांच्यासह गुरुवारी सांगोला दौऱ्यावर होते. पंचायत समितीच्या आवारात सदाभाऊ गाडीतून उतरताच त्यांच्याच एका जुन्या जोडीदाराने ‘भाऊ, आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा, असे म्हणत ताफा अडवला आणि सदाभाऊंची बोलतीच बंद झाली.
त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते बोलू लागताच, मी भाऊंशी बोलतोय, मध्ये कोणी बोलण्याची गरज नाही’ असे ठणकावत इतरांनाही गप्प केले. त्यामुळे कशीतरी वेळ मारून नेत सदाभाऊंनी स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.
सांगोला तालुक्यातील एक हॉटेलचालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकारी अशोक शिनगारे असे त्या सदाभाऊंच्या जुन्या जोडीदाराचे नाव आहे. पूर्वी तो सदाभाऊंसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत होता. आता तो मांजरी (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायत सदस्य आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563017258709341/
□ नेमके काय घडले ?
महूद ग्रामपंचायतीची पाहणी केल्यानंतर पंचायती राज समितीचा ताफा सांगोला पंचायत समितीकडे वळला. सर्वप्रथम आ. सदाभाऊंची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली. गाडीमधून सदाभाऊ खोत •उतरताच अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत आहे’, असे म्हणत सदाभाऊंना अडवले.
पुढे ‘२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही,’ असे म्हणत सदाभाऊंना कोंडीत पकडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यात सदाभाऊ खोतांनाही काय बोलावे सुचेना. मात्र, सदाभाऊंनी कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली.
□ कसली उधारी ?
सन २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मांजरी या गावचे असलेले अशोक शिनगारे हे सदाभाऊंचे सहकारी होते. तेव्हा सदाभाऊंसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. शिवाय मांजरी गावात शिनगारे यांचे हॉटेल होते. त्या हॉटेलमध्ये सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी खाल्ल्यापिल्याची उधारी अद्याप बाकी आहे. तीच उधारी शिनगारे मागत होते.
□ मी त्यांना ओळखत नाही : सदाभाऊ
बैठकीनंतर बाहेर आलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत विचारले असता, ‘मी त्यांना ओळखत नाही. तुम्हाला काय माहीत असेल तर मला सांगा’ असे सांगत सदाभाऊंनी ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेले कारस्थान आहे’ असे बोलून सदाभाऊंनी हात वर केले.
मी अनेक वेळा सांगोल्यात गेलो, परंतु कोणीही मला उधारी असल्याचे सांगितले नाही. माझा काहीही संबंध नाही. मी त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवलोही नाही. हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्याच्या विरोधात सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ढाबाचालकालाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा सर्व स्टंट आहे मी त्याला ओळखत नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/562906182053782/