मोहोळ : मोहोळ पंचायत समिती मध्ये काही चुकीच्या तर गोष्टी बरोबरच चागल्या ही काही गोष्टी आढळून आल्या आहेत. विहीर घोटाळा व बचत गटाचे तक्रारीनुसार माहिती घेऊन त्याबाबत ही तात्काळ चौकशी करणार असल्याची माहिती, पंचायतराज कमिटीचे गटप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी पंचायतराज कमिटीच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली.
या दौऱ्यात पंचायतराज कमिटीचे गटप्रमुख कैलास पाटील ,भाजपचे आ विजय रहांगडाले, राष्ट्रवादीचे आमदार माधवराव पवार, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते .
पंचायत राज कमिटीचा दौरा मोहोळ तालुक्यात येत असल्याचे समजतात सामाजिक कार्यकर्ते दशरथ काळे व संजिव खिलारे यांनी मोहोळ तालुक्यात झालेल्या विहीर घोटाळ्याची चौकशी करावी तसेच ग्रामपंचायतींच्या मार्फत देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या विविध योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत गेल्या नाहीत, याची चौकशी करावी यांची मागणी केली. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ पंचायत समितीत विस्ताराधिकारी पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक सुरू असून त्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून बदली करण्याची मागणी केली.
सामाजिक कार्यकर्ते नागेश बिराजदार यांनी पंचायत समितीच्या हद्दीत असलेल्या बचत गटांच्या गाळ्याची चौकशी करून त्या ठिकाणी अनधिकृतपणे वाटप करण्यात आलेले गाळे बचत गटांना देण्यात यावे, संबंधित यातील दोषी अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली .
या वेळी गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, प्रशासन अधिकारी शशिकांत नरगिडे, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता तानाजी दळवी, गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, आरोग्य अधिकारी अरुण पात्रुडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी आदी सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या उद्दिष्टापेक्षा ही ज्यादा विजिट देऊन चांगले काम केल्याचे निदर्शनास आले. या शिवाय आरोग्य विभागाने कोरोना महामारीच्या काळामध्ये उत्कृष्ट काम केल्याचेही निदर्शनास आले. त्याबाबत शिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे कौतुक करीत, उर्वरित आलेल्या तक्रारी बाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
बोगस विहीर प्रकरणी अनेकांकडून तक्रारी उपलब्ध झाल्या आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन. त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांची सचिवांसमोर साक्ष लावू असे आवाहन या कमिटीचे गटप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563017258709341/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ उत्तर सोलापूरमधील ६८ जागा महिलांसाठी राखीव
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या १२४ सदस्यांपैकी अनुसूचित जाती जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातून तब्बल ६८ महिला सदस्य निवडायचे आहेत. यामध्ये ९ जाती तर एक जमातीच्या महिलेला संधी मिळणार आहे.
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची १२४ सदस्य संख्या आहे. यामधून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण गटातील महिलांसाठी ६८ ठिकाणी आरक्षित केले आहे.
मार्डी, कौठाळी, नंदूर ग्रामपंचायतीसाठी मार्डी ग्रामपंचायतीसाठी १५ पैकी जमातीचा एक तर जातीचे तीन, कौठाळीत ११ पैकी एक तर नंदूरमध्ये ९ पैकी दोन जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित केल्या आहेत.
१५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत महिलांसाठी ८, ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतं ६, ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत ५ तर ७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी ४ जागा महिलांसाठी राखीव आठेवण्यात आल्या आहेत.
यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एक (कारंबा), अनुसूचित जातीसाठी ८ तर सर्वसाधारण महिलांसाठी ५८ ठिकाणी आरक्षण काढले आहे.
निवडायचे असून एक मार्डी व एक कारंबा ग्रामपंचायतीसाठी राखीव आहे. अनुसूचित जातीसाठी १९ सदस्य राखीव करण्यात आले असून जमाती मधून दोन सदस्य त्यातील ८ महिलांसाठी आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/562009865476747/