Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: moneylender सावकारकीच्या मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने केली आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

moneylender सावकारकीच्या मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने केली आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/06/17 at 9:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांना अटक

सोलापूर : व्याजाने घेतलेले पैसे परत करून देखील सावकाराने दिलेल्या मानसिक त्रासास कंटाळून पंढरपुरातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर सावकारीचा प्रश्न ऐरणीवर आला. Fed up with the mental anguish of moneylender, the youth committed suicide

लहू दिगांबर शिंगाडे (वय २८ रा. देशमुख मठामागे, भक्तीमार्ग पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. लहूने बुधवारी (15) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत या तरुणाच्या पत्नीने काल गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहू दिगांबर शिंगाडे यांनी संभाजी मरिबा काळे व आंबिका संभाजी काळे (दोघे रा. पंढरपूर) यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ते रुपये परतफेड करुन देखील आणखी ४० हजार रुपये व्याजाचे दे म्हणून सतत काळे यांनी लहू शिंगाडे यांना तगादा लावला.

पुढे शिवीगाळ, धमकावण्यापर्यत विषय गेला. लहू यांना त्रास दिल्याने व त्या त्रासापोटीच मानसिक तणावात लहू यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यामुळे लहू यांना आत्महत्या करण्यास, त्याचे मरणास संभाजी संभाजी काळे यांनीच प्रवृत्त केल्याची तक्रार मोनाली लहू शिंगाडे (वय २२, रा. भक्तीमार्ग, बाबासाहेब देशमुख मठामागे, पंढरपूर) यांनी दिली आहे. पुढील तपास सपोनि निलेश बागाव करीत आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/563247605352973/

 

□ प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांना अटक

 

सोलापूर – तक्रारी अर्जाची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यास अर्वाच्य शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केल्याची घटना वटवटे (ता.मोहोळ) येथील जकराया शुगर कारखाना जवळ घडली. या प्रकरणात कामतीच्या पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

यासंदर्भात संजय ताराचंद ननावरे या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. कारखाना परिसरातील शेतात दूषित पाणी येत असल्याची तक्रार नारायण गुंड यांनी केली होती. त्या तक्रारी अर्जाचे पाहणी करणसाठी ननवरे हे मंगळवारी (ता .14) दुपारच्या सुमारास गेले होते.

त्यावेळी नारायण गुंड त्यांचा भाऊ हरी शिवाजी गुंड आणि लहु पंढरी जाधव (सर्व रा.येणकी ता.मोहोळ) या तिघांनी त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून कामात अडथळा केला होता. पुढील तपास सहाय्यक फौजदार दुधे हे करीत आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/563193842025016/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Fed #mental #anguish #moneylender #youth #committed #suicide #pandharpur, #सावकारकी #मानसिक #त्रास #कंटाळून #युवक #आत्महत्या #भक्तीमार्ग #पंढरपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहावी : राज्याचा निकाल ९६.९४% तर सोलापूरचा ९७.७४%, सर्वात कमी नाशिक
Next Article पुणे तिथे काय उणे; हार्डवेअरचे काम करत सर्व विषयात मिळवले 35 मार्क

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?