कुर्डुवाडी : हर्षल बागल
निमगाव (टें) चे सरपंच माढा तालुका पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे चेअरमन, जिल्हा दूध संघाचे संचालक, मार्केट कमिटीचे सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, करमाळ्यातून विधानसभेला पराभव, लोकसभा निवडणुकीत पराभव, त्यानंतर करमाळा विधानसभा अपक्ष विजयी अशा संघर्षाची अनेक वादळे पार करीत आमदार झालेले संजयमामा शिंदे हे राज्यसभेच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिल्याचे दिसून आले. Sanjay Mama Shinde Discussion in state politics, Independents gain strength in state politics Sanjay Raut Kurduwadi Madha
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कथित आरोपांमुळे आ. संजयमामा शिंदे यांची कारकिर्दच राज्याच्या समोर आल्याचे दिसते. एक साखर कारखाना व एक सूतगिरणी संजयमामांनी यशस्वी सांभाळत वर्षाला शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या शिंदे कुटुंबाने गाळपात नवा विक्रम प्रस्थापित केला. शेतकऱ्यांची बिले वेळेवर दिली.
भोसरे जिल्हा परिषद गटात पराभवाने जो संघर्ष सुरु झाला, तो राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत आला. हेच आ. संजयमामा शिंदे जर वर्षाला पाच हजार कामगारांना रोजगार देतात, एक साखर कारखाना व सूतगिरणी, डिस्टलरी, कोजनरेशन प्रकल्प यशस्वीपणे चालवतात. मतदार संघात हजारो कोटींच्या जल सिंचनाच्या योजना मार्गी लावतात. त्या संजयमामांना राज्यसभेच्या निवडणुकीत चार पाच कोटी घेतल्याचा एक चिल्लर आरोप संजय राऊंताकडून झाला. यावर जनसामान्यांचा विश्वास नाही. राजकीय विश्लेषकांनी देखील संजय राऊंताचा आरोप हा भाजपाने केलेल्या पराभवाच्या नैराश्यातून केल्याचे बोलले जाते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/564301921914208/
सोलापूर जिल्ह्यात आता संजयमामा यांनी जिल्ह्याचे नेतृत्वे हाती घेतले. दूध संघाच्या निवडीत देखील आपल्या नेतृत्वाची झलक संजयमामांनी दाखवली. माझ्या राजकीय आयुष्याबद्दल संजय राऊंताना माहीत नाही. राऊत साहेबांनी माहिती घेऊन बोलावे, असे आदरपूर्वक उत्तर संजयमामांनी दिले. यातून एक स्पष्ट होते की वरिष्ठ नेते – संजय राऊत यांचा येथे संजयमामांनी आदर देखील राखला पण राज्याच्या राजकारणात येथेच त्यांनी प्रवेश खऱ्या अर्थाने केला.
आ. संजयमामा शिंदे यांच्याकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीत जास्त नजर राहील. अजितदादा पवार सांगतील तेच मी करणार असा त्यांचा अट्टाहास आहे. अन अजितदादा पवार कधी काय सांगतील ते कुणाला कळणार नाही. पण राज्यसभेच्या निवडणुकीत संजय राऊंतानी मात्र संजयमामांना एकप्रकारे राज्याच्या राजकारणात या असे जणू निमंत्रणच दिले असेच काही …..
□ अपक्षांची राज्याच्या राजकारणात ताकद वाढली
विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष आमदार पुन्हा एकदा गेमचेंजर असतील. प्रत्येक पक्षाला अपक्षांची गरज आहे. शिवसेनेने अगोदरच कथित आरोप अपक्षांवर केले. त्यामुळे शिवसेनवर विश्वासार्हता नाही हेच दिसते. अपक्ष हे सत्तेचा उपयोग मतदार संघात करण्यासाठी सत्तेतील राष्ट्रवादी व काँग्रेसला मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुप्तमतदान असल्याने अपक्षांच्या हाती विधानपरिषद आहे. त्यामुळे संजयमामा शिंदे व इतर अपक्षांची राज्याच्या राजकारणात ताकद वाढल्याचे दिसते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/564375665240167/