सोलापूर – शहरातील उत्तर कसबा आणि न्यू बुधवार पेठ परिसरात दोघा जणांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद विविध पोलिसात झाली आहे. Suicide by hanging at two places in Solapur city
त्यापैकी पहिली घटना काल रविवारी (ता. 19) रात्रीच्या सुमारास उत्तर कसबा येथे घडली. निलया मारुती सिंदखेडकर (वय ४७) असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. काल रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. या मागचे कारण समजले नाही. हवालदार कामुर्ती पुढील तपास करीत आहे.
तर दुसरी घटना न्यू बुधवार पेठेतील रमांजली चौकाजवळ आज सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नागेश दादाराव सोनकांबळे (वय ४५) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत .
□ घराबाहेर निघून जा म्हणून वृद्ध आईस मुलाकडून मारहाण
सोलापूर – तू माझ्या घरात राहू नको असे म्हणून वृद्ध मातेस मारहाण केल्याची घटना (दर्गनहळी ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. सुगलाबाई अण्णाराव बिराजदार (वय ८५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी (ता. 18) सकाळच्या सुमारास यांचा मुलगा सुरेंद्र बिराजदार याने आईला हाताने मारहाण करून ढकलून दिले होते. त्यात त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565373551807045/
□ शहरात ८ लाख ४१ हजाराची विदेशी दारु जप्त; दोघांना अटक
सोलापूर – राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने आज रविवारी दिनांक पहाटेच्या सुमारास गेंट्याल टाकीज चौक येथे सापळा रचून एका टेंपोतील गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा असा एकूण रुपये ८ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.
राज्य उत्पादनच्या भरारी पथकाने आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास गेंट्याल चौक येथे टेंपो क्रमांक एमएच०४ ईबी ६०५० या वाहनाला अडवून त्याची तपासणी केली. असता त्यात शिवा बाबू राठोड (रा. विजापूर) आणि इरेश गंगाधर नावडे (रा. भवानी पेठ सोलापूर) आढळून आले. त्यांच्या वाहनात गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे एकूण ११० बॉक्स आढळून आले. जप्त केलेल्या दारू ची किंमत ८ लाख ४१ इतकी आहे. वाहनासह एकूण १४ लाख ४१ हजाराचा माल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर माळी (रा.मंद्रुप ता.दक्षिण सोलापूर) हा फरार असल्याचे सांगण्यात आले. राज्य उत्पादनचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार , दुय्यम निरीक्षक एस. ए. पाटील, सुरेश झगडे, श्रीमती मिसाळ आदींनी ही कामगिरी केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565096181834782/