Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदे गुजरातमध्ये? भाजप प्रवेशाची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदे गुजरातमध्ये? भाजप प्रवेशाची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2022/06/21 at 10:08 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा पत्ता लागला आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. Thackeray government in danger; Minister Eknath Shinde in Gujarat? Ahmedabad Mahavikas Aghadi Shiv Sena likely to join BJP

 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार फुटल्यास महाविकास आघाडीचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं.

राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षात सध्या अंतर्गत बंडाळी माजल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे हे तीव्र नाराज असून ते थेट भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी (दि. 21 जून) रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

मात्र, एकनाथ शिंदे हे 11 समर्थक आमदारांच्या गटासह महाराष्ट्राबाहेर गुजरात येथे असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी पाहता ते भाजपात गेल्यास शिवसेनेला पर्यायाने महाविकास आघाडीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळू देखील शकतं.

आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दुपारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का? याकडे लक्ष लागलं आहे. काल सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. एवढेच नाही तर गुजरात पोलिसांनी या हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे, अशीही दृश्य न्यूज चॅनेल्सवर दाखवली जात आहेत. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती रिपोर्टरने दिली आहे. तसेच त्यानंतर हे भाजप नेते अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ११ आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.

 

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. फोन नॉटरिचेबल लागत आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

 

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Thackeray #government #danger #Minister #Eknath Shinde #Gujarat #Ahmedabad #MahavikasAghadi #ShivSena #join #BJP, #ठाकरे #सरकार #धोक्यात #मंत्री #एकनाथशिंदे #गुजरात #अहमदाबाद #भाजप #प्रवेश #शिवसेना #शक्यता #महाविकास #आघाडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Vidhanparishad भाजपचे 5 ही उमेदवार विजयी तर शिवसेनेची 3 मते फुटली
Next Article एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क झाला, महाराष्ट्रात मध्यप्रदेश सारखा पॅटर्न चालणार नाही : संजय राऊत

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?