● महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने
मुंबई : शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पहाटेच सूरतहून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. सूरतमधील हॉटेलमधून निघण्याआधी बंडखोर आमदारांचा एक ग्रूप फोटो समोर आला आणि यात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. Bachchu Kadu said, “Water is gone from the head, support will reach 50 MLAs. Dismiss the government.”
गुवाहाटीला पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी संपूर्ण घटनाक्रम वृत्तवाहिनीला फोनवरुन सांगितला आहे. यात बच्चू कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोनवरुन बोलणं झाल्याचं म्हटलं.
“मी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी बोलणं झालं. मी दोन्ही निवडणुकीला म्हणजेच राज्यसभा आणि विधान परिषदेलाही तुम्हाला मतदान केलं. पण अचानक हे वातावरण तयार झालं आणि मी आज इथं आहे असं त्यांना सांगितलं. एवढा सगळा प्रकार झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज होतेच. त्यांनी तुम्ही परत या असं आवाहन केलं. पण तोवर सगळं पाणी डोक्यावरुन गेलं आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. “सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस – राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/566299848381082/
एकनाथ शिंदे यांच्या गटाला असलेलं समर्थन हे ५० आमदारांपर्यंत पोहोचेल असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला. गुवाहाटीमध्ये सध्या शिवसेनेचे ३३ आमदार आणि अपक्ष ३ असे ३६ आमदार आहेत. यात शिवसेनेचे आणखी काही आमदार येणार आहेत. तसंच काँग्रेसचेही आमदार संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात हे समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल, असं बच्चू कडू म्हणाले.
□ महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने
एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेचे सरकार अल्पमतात आले आहे त्यात एकनाथ शिंदे आणि • नाराज आमदार आसाममध्ये जाऊन बसल्याने ते आता नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत त्यामुळे शिवसेनेची उरलीसुरली आशाही धुळीस मिळाली आहे त्यात जाणार यावर शिक्का मारला आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकिय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालला आहे असे व्टिट करत पुढे संजय राऊत यांच्या ट्विटने आता शिवसेनेचे सरकार काय घडणार हेच सांगितले आहे.
□ आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्रीचा उल्लेख हटवला
एकनाथ शिंदेचे बंडामुळे शिवसेनेचे सरकार जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून संध्याकाळपर्यंत ठाकरे मुख्यमंत्री असतील का नाही यावर शिक्कामोर्तब होण्याआधीच आदित्य ठाकरेंनी आपल्या व्टिटर प्रोफाईलमधून पर्यावरण मंत्री हा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात मविआ सरकारचे आता काही खरे नाही असे चित्र स्पष्ट होत आहे.
□ एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेसाठी दुपारी मुंबईत येण्याची शक्यता
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत उतरताच 40 आमदारांचा गट स्थापला असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. आज दुपापर्यंत एकनाथ शिंदे मुंबईत येण्याची शक्यता बोलली जात आहे. एकनाथ शिंदे स्पेशल विमानाने मुंबईला येऊन राज्यपालाची भेट घेऊ शकतात. तसेच ते आपल्याच गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याची विनंती करणार जर त्यांची विनंती मान्य झाली तर एकनाथ शिंदे भाजपासोबत सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566258021718598/