Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेतील भारतीयांना दिलासा; भारतीयांच्या अमेरिकेतील नोक-या वाचणार, व्हिसा निर्बंध शिथिल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अमेरिकेतील भारतीयांना दिलासा; भारतीयांच्या अमेरिकेतील नोक-या वाचणार, व्हिसा निर्बंध शिथिल

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 8:02 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन : अमेरिकेने एच१ बी आणि एल १ व्हिसा संदर्भात काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे अमेरिकेत काम करत असलेल्या आयटी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प प्रशासनाने याबाबतची घोषणा केली आहे. अमेरिकेने एच१ बी व्हिसावर निर्बंध घातल्याने त्याचा फटका हजारो भारतीयांना बसला होता. पण आता या व्हिसावरील निर्बंध शिथिल केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसा नियमांत बदल केले आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत लागू असलेले व्हिसा निर्बंध अखेर काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी व्हिसाच्या नियमावलीत सूट दिली आहे. या निर्णयाने हिंदुस्थानसह इतर देशांतील नागरिकांच्या अमेरिकेच्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्या वाचणार आहेत.
त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. व्हिसाधारकाच्या पत्नी आणि मुलांनाही प्रवास करता येणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

व्हिसाधारकाने अमेरिकेतील आधीच्या नोकरीसाठी अर्ज केला तर त्याला नियमांतील सूटचा मोठा फायदा मिळणार आहे. तांत्रिक विभागातील तज्ञ, वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापक तसेच इतर कर्मचाऱयांनाही प्रवासाला मुभा दिली जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 जूनला एच-1 बी व्हिसा निलंबित केल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा हिंदुस्थानसह अन्य काही देशांना मोठा झटका बसला होता. आता अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी प्रशासनाने व्हिसा निर्बंध शिथिल केले आहेत.

ट्रम्प प्रशासनाने कोरोना योद्ध्यांनाही अमेरिकेचा दरवाजा खुला केला आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे, विशेषत: कोरोना महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हिसाधारक आरोग्य सेवकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे. अमेरिकेत कोरोना फैलावाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण बनत चालली असतानाच ट्रम्प प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #अमेरिका #व्हिसा #निर्बंधशिथिल #भारतीय #नोकरी #वाचली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुप्रिया सुळेंची प्रकरण निवळण्यात महत्वाची भूमिका; पार्थ पवार सिल्वर ओकवर दाखल, सव्वादोन तास चर्चा
Next Article आमदार सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?