□ मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार, पवारांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री झालो : उध्दव ठाकरे
मुंबई : एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करावं, असे शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना सुचवल्याचे वृत्त आहे. उध्दव ठाकरेंना कोरोना झाल्याने दुरध्वनीवरुन झालेल्या संवादात पवारांनी हा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले आहे. पवार यांनी ठाकरे यांची भेटही घेतली. दरम्यान माझ्या शिवसैनिकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर समोर येऊन सांगा, मी पद सोडायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. Give the post of Chief Minister to Eknath Shinde; Discussion on Sharad Pawar’s advice to Thackeray Facebook Live Address
हा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर झालेल्या संवादात दिल्याची माहिती मिळत आहे. आता पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात एक बैठक सुरु आहे. त्या बैठकीत हा सल्ला दिलाय.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लाईव्ह आपली भूमिका मांडली. मी मुख्यमंत्री म्हणून आम्हाला मान्य नसेल असे शिवसेनेच्या आमदाराने माझ्याकडे येऊन सांगितले तर मी राजीनामा देतो, असे उध्दव ठाकरेंनी सांगितले आहे. मी माझा वर्षावरचा मुक्काम मातोश्रीला हलवण्यास तयार आहे. तसेच मी माझे शिवसेना प्रमुखही पद सोडायला तयार आहे, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधन केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो असं ठाकरे आपल्या संबोधनात म्हंटले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार तेव्हा शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी सांगितल्यावरच आपण मुख्यमंत्रीपद सांभाळलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566532735024460/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
लाईव्ह संवादात ठाकरे म्हणाले की, आज मी नेमकं काय बोलणार? मला दुख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दुखं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला.
काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे असं सांगितलं, त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत आहेत की मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तुम्ही नकोत, असं त्यांनी बोलायला हवं होतं.
मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मी वर्षावरून मातोश्रीवर मुक्काम हलवतो. मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केलाय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566604191683981/
□ मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर मला आनंद
मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर मला आनंद आहे. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक.
पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी असल्याचे म्हटले. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566490305028703/