सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील अकोला रोडवरील वरकुटे वस्ती परिसरात एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. हा खून चुलत भावाने केल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्यास ताब्यात घेतले आहे. Brother kills brother in Dream XI game in Solapur
मोबाईलमधील ड्रीम इलेवन या गेममधून मिळालेली १ लाखाची रक्कम चुलत भावाने न दिल्याने डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून सचिन सिद्धेश्वर वरकुटे या २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला.
मंगळवेढा तालुक्यातील अकोला येथे घरनिकी-अकोला रोडवरील वरकुटे वस्ती येथे ऊसाच्या शेतात सचिन सिद्धेश्वर वरकुटे (वय २३, रा. अकोला ता. मंगळवेढा) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बराच वेळ झाल्यामुळे सचिन मोटार चालू करून आला नाही, कुठे गेला हे पाहण्यासाठी मयत सचिनची आई शेतामध्ये गेली असता सचिन मृतावस्थेत आढळला. कोणत्यातरी अज्ञात हत्याराने त्याच्या डोक्यावर मारून निर्घृण हत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन वरकुटे हा तरुण मुलगा सकाळी मोटार चालू करण्यासाठी गेला होता तो परत आला नाही. म्हणून त्याची आई बराच वेळ झाल्यामुळे सचिन कुठे गेला हे पाहण्यासाठी शेतात गेली होती. दरम्यान, शेतात सचिन मृतावस्थेत आढळला.
या घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सौरभ शेटे, पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे, विठ्ठल विभुते, श्रीमंत पवार, सुनील मोरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566701488340918/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मयत सचिनचा मोबाईल पाण्यात फेकून देण्यात आला होता. सदर खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवली असता चुलत भाऊ विजय नामदेव वरकुटे (वय १८) या संशयितास ताब्यात घेण्यात आले. मयत व संशयिताचे मोबाईलचे सीडीआर लोकेशन मिळून तपास केला. सदरचा मोबाईल पोलिसांना सापडला व त्या मोबाईलमधील ॲप्सचा अभ्यास करून सदरचा खून ड्रीम इलेव्हन सी संबंधित गेमच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारातील असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दि.२२ रोजी विजय मेंढ्यांसाठी चारा आणण्यासाठी शेताकडे कुन्हाड घेऊन गेला होता. यावेळी विजयने फोन करून सचिनला बोलवून रक्कम कधी देतो असे विचारले त्यावर मी देत नसतो, असे म्हणाला व विजयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये बघत बसला. यावेळी सचिनने हातातील कुऱ्हाडीने जोराचा घाव घातला. पहिल्या घावात डोक्याच्या उजव्या भागाची कवटी फुटली तर दुसरा घाव गळ्यावर घातला, त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
ड्रीम इलेव्हन एक मोबाईल अँप आहे. या अँपद्वारे कोणत्याही सामन्याआधी आपली आवडती प्लेइंग इलेव्हन निवडायची असते. जितके जण या ॲपद्वारे टीम निवडतात, त्यांच्या पॉइंट्सच्या रैंकिंगच्या आधारावर त्यांना पैसे मिळतात. या ॲपद्वारे क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमध्येही बेस्ट प्लेइंग टीम निवडता अनेक जण पॉइंट्स जमवतात येते. यातून आणि पैसे मिळवतात. अनेक तरुण या गेमच्या आहारी गेले आहेत.
मयताचे व संशयित व्यक्तीचे मोबाईल सीडीआर व लोकेशन मिळवून तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी स्वतःहून हजर झाला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566933574984376/