Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Hotel Radisson Blu बंडखोर आमदारांवर होतोय एवढा खर्च, वाचून व्हाल थक्क
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

Hotel Radisson Blu बंडखोर आमदारांवर होतोय एवढा खर्च, वाचून व्हाल थक्क

Surajya Digital
Last updated: 2022/06/24 at 9:10 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू या हॉटेलात तळ ठोकला आहे. याची व्यवस्था खूप पंचतारांकित पद्धतीने केलीय. याविषयी चर्चा होत आहे. याबाबतीत आता माहिती समोर येत आहे. Radisson Blu Hotel, You will be surprised to read that so much is being spent on rebel MLAs

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.

पण सध्या दररोज अनेक शिवसेना आमदार या हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हॉटेलबाहेर आमदारांच्या सुरक्षेसाठी आणि हे आमदार फुटू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मागील एक दोन दिवसांपासून तुम्ही सतत या पंचतारांकित हॉटेलचं नाव ऐकत असाल. मात्र, या हॉटेलमध्ये राहाण्यासाठी किती खर्च आला असेल, हे तुम्हाला माहितीये का? मिळालेली माहिती वाचाल तर थक्क व्हाल.

या आमदारांसाठी हॉटेलमधील 70 खोल्यांचे बुकिंग केले आहे. याचा एक आठवड्याचा खर्च सुमारे 58 लाख रूपये इतका असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या आमदारांच्या खानपानावर दररोज 8 लाख खर्च केला जात आहे. दरम्यान, चार्टर्ड विमानाचा प्रवास खर्च, खाण्याचा आणि राहण्याचा खर्च कोटी रूपये होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सुरतमधील खर्च, या सर्व आमदारांना विशेष विमानाने गुवाहाटीला आणणे, इथे त्यांची ठेवण्यात येणारी बडदास्त या सर्वाचा आतापर्यंतचा खर्च कुणालाही माहिती नाही, आणि हा सर्व खर्च कोण करतंय हेही कुणाला माहिती नाही.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

एकंदरीतच आमदारांच्या राहाण्याची सोय, खानपानाचा खर्च आणि चार्टर्ड विमानाने होणाऱ्या प्रवासाचा खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..’, एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं आता जाणून घेऊया आमदार थांबले असलेल्या हॉटेल रेडिसन ब्लूची वैशिष्ट्ये नेमकी काय , तर या पंचतारांकित हॉटेलमध्ये 190 खोल्या आहेत, 190 पैकी 70 खोल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत, या हॉटेलचं व्यवस्थापन सध्या कोणाचंही नवीन बुकिंग घेत नाही, रेडिसन ब्लूचे बॅक्वेट बंद करण्यात आले आहे, सध्या या हॉटेलमध्ये राहात असलेल्यांनाच तिथल्या भोजनकक्षात (रेस्टॉरंटमध्ये) जाण्याची परवानगी आहे, अशी वैशिष्ट्य सांगता येतील.

नजिकच्या जलुकबारी पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांसह, राखीव बटालियन आणि आसाम पोलिसांच्या कमांडो युनिट्सचे डझनभर कर्मचारी हॉटेलवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हॉटेल लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे १५ किमी अंतरावर आहे.

 

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #RadissonBlu #Hotel, #surprised #read #somuch #spent #rebel #MLAs, #बंडखोर #आमदार #एवढाखर्च #वाचून #व्हाल #थक्क #हॉटेल #रेडिसनब्लू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच ! शरद पवारांनी दिले उत्तर, याचा अजित पवारांना परिचय नाही
Next Article बंडखोर 40 आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो, कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?