Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वेळ निघून गेली, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान, मुंबईत येऊन सामना करा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

वेळ निघून गेली, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान, मुंबईत येऊन सामना करा

Surajya Digital
Last updated: 2022/06/24 at 4:17 PM
Surajya Digital
Share
8 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ बंडखोर 40 आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो, कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई

मुंबई : आता शिंदे गटाची वेळ निघून गेली आहे, मुंबईत या, आता आमची वेळ सुरु झाली आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिले आहे. शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर राऊत यांनी हे विधान केले आहे. आम्ही हार मानणार नाही, विजय आमचाच होणार, बहुमत सिद्ध आम्हीच करु, जर रस्त्यावर लढाई झाली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत, असे राऊत यांनी म्हटले. Time has passed, Sanjay Raut’s challenge to Eknath Shinde, come to Mumbai and face rebellious MLA politics

माझी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा झाली. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. आमचं सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल असेही राऊत म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीनं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो, आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार असल्याचा निर्धार राऊत यांनी केला आहे. हाऊसमध्ये देखील आम्ही जिंकू असेही राऊत यावेळी म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज केलं आहे. ज्यांना आमचा सामना करायचा आहे, त्यांनी मुंबईत याव आणि सामना करावा असा इशारा देखील राऊतांनी यावेळी दिला.

या लोकांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही संधी दिली होती. मात्र, वेळ निघून गेली आहे. त्यामुळं आम्ही आता लढायला तयार असल्याचे राऊत म्हणाले. याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषणा झाली. याच इमारतीत महायुतीचं बंधन बांधण्यात आलं. याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे. हे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. आम्हाला जे करायचे ते आम्ही आता केलं आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरु असल्याचंही राऊतांनी सांगितलं.

 

शिवसेना विधीमंडळ गट नेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभु यांना मान्यता देण्यात आली आहे. विधान सभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे. त्यामुळे गटनेतेपदाचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं. त्यानंतर आता कायदेशीर लढाईला सुरुवात होणार आहे.

संजय राऊत यांना शिवसेना पक्षात आजही विशेष स्थान आहे. पक्षात त्यांचा शब्द डावलला जात नाही. शिवसेनेने सामनाचे संपूर्ण अधिकार त्यांच्या हातात दिलेले आहेत. कोणत्याही पक्षात कुणी काय बोलायचं याचा एक सिद्धांत असतो.  त्यामुळे परिस्थिती ओळखून त्यानुसार संजय राऊत त्यांची भूमिका वठवतात. यांची अगदी सुरुवातीपासूनच भाजपाविरोधात मते होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांची सौम्य भूमिका पहायला मिळाली आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या गोटात असलेल्या 16 जणांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना यासंबंधीचे पत्र देण्यात आले आहे. तसेच गटनेतेपदी अजय चौधरी यांच्या निवडीला मंजुरी देण्यात आली आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे. आता शिंदे उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काही दिवस कायदेशीर लढाई पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३४ आमदारांच्या सहीचे पत्र विधान मंडळाला दिले असून त्यावर आमदारांनी केलेल्या सह्या खर्‍या आहेत का ते आपण तपासणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नवे गटनेते म्हणून अजय चौधरी यांना आपण मान्यता दिल्याचे झिरवळ यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे गेल्यानंतर शिवसेनेचे गटनेते आपणच असल्याचा दावा एका पत्राद्वारे केला आहे. तसेच शिवसेना मुख्य प्रतोदपदावरून सुनील प्रभू यांची हाकालपट्टी करत त्या ठिकाणी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचे पत्र शिंदे यांनी नरहरी झिरवळ यांना दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे गटनेता आणि मुख्य प्रतोद कोण? तसेच शिंदे यांनी दिलेल्या पत्राचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/567681821576218/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/567737351570665/

 

□ बंडखोर 40 आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो, कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई

 

 

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार आहे. गुप्तचर यंत्रणा फेल झाल्यानेच हा बाका प्रसंग महाविकास आघाडी सरकारवर आला आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्या-त्या जिल्ह्यातील आमदारांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

 

राज्य सरकार या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

 

राज्यातील गुप्तचर यंत्रणा फेल झाल्याचा फटका आता जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांना बसणार आहे. या सर्वांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवार यांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी राज्यातील गुप्तचर यंत्रणेचे अपयश समोर आले होते. त्यानंतर गुप्तचर यंत्रणा प्रभावशाली न केल्यामुळे शिवसेनेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून समोर आले. भाजप नेते वारंवार ठाकरे सरकार कोसळणार असल्याचे जाहीर वक्तव्य करत असतांनाही राज्यातील इंटेलिजन्स यंत्रणा गाफील राहिली. त्यानंतर कारवाईच्या मोडमध्ये सरकार आला आहे.

अनेक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सूरतला गेले. पण, याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार आहे. आमदाराचे अधिकारी आणि पोलिसांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती दिली नाही. यामुळे आता राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे.

 

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना निकाल लागल्यानंतर पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबई सूरत रस्त्याने गुजरातपर्यंत पोहचले. पालघर जिल्ह्यातील तलासरीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा एकनाथ शिंदे यांना होती. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे आणि समर्थक 20 पेक्षा जास्त आमदार सूरतला रवाला झाले. इतकी मोठी घडामोडी घडत असताना याची कल्पना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली नव्हती.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती, अशी देखील माहिती आहे. इंटेलिजन्सचां रिपोर्ट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/567739738237093/

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Time #passed #SanjayRaut's #challenge #EknathShinde #Mumbai #face #rebellious #MLA #politics, #वेळ #संजयराऊत #एकनाथशिंदे #आव्हान #मुंबई #सामना #राजकारण #बंडखोर #आमदार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बंडखोर 40 आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो, कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई
Next Article महाराष्ट्रात मान्सून दाखल तर कृषीमंत्री शेतक-यांना वा-यावर सोडून आसामच्या चिंतन शिबिरात दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?