मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 46 आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. Big blow to Thackeray government, decision to expel Narhari Jirwal is politics
बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू असल्याचीही माहिती आहे. सात पानी पाठवलेल्या पत्रामध्ये ३४ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे काल ( गुरुवारी ) रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. त्यांनी आपले संरक्षण सोडले असून आपण अज्ञातस्थळी जात असल्याचे म्हटले होते. शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री हे सुद्धा संरक्षण सोडून परराज्यात गेले आहेत.
परराज्यात जाण्यापूर्वी या आमदारांनी आपले संरक्षण मुंबईतच सोडले आणि ते अज्ञात स्थळी गेले. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सध्या सर्व राजकीय घडामोडीसाठी महत्वाची व्यक्ती ठरू लागले होते. नवीन गटनेते पदाची अथवा प्रतोद याची नेमणूक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या सर्व घडामोडीत झिरवाळ यांनीही संरक्षण सोडले आणि ते सुद्धा अज्ञात स्थळी गेले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/567911374886596/
आमदार अजय चौधरी यांची राज्य विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ मंजुरी दिली. यासंदर्भातील पत्र उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना झटका बसला आहे.
□ सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात आता नवीन पैलू समोर आला आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर प्रतोदपदी सुनील प्रभू कायम आहेत. दरम्यान शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेना पक्षाचे प्रत्येक म्हणून भरत गोगावले यांचे नाव सुचवले आहे त्यांच्यासोबत 34 आमदारांची यादी पाठवली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी प्रत्यक्ष हजर रहावे किंवा कसे याबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाची मान्यता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/567867741557626/