पुणे : पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलन केले आहे. तसेच आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारीही शिवसैनिकांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. तर दिलीप लांडे यांचे पोस्टर फाडले होते. On Shiv Sainik Road in Pune, Tanaji Sawant’s office was blown up, stone-throwing order protected
राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यात कोणत्याही प्रकारचे राजकीय मिळावे, मिरवणुका आणि घोषणाबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर ठाणे शहरात 144 CrPC लागू करण्यात आले आहे.
राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. काही ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
2019 ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेनं तानाजी सावंत यांनी मंत्रीपदाची संधी दिली नाही. तेव्हापासूनच तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडोखोरी केल्यामुळं शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात पवित्रा शिवसैनिक पवित्रा घेत असल्याचे चित्र दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या घटनेनंतर तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/568365141507886/
आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयात तोडफोड करण्यात आली. हे कार्यालय भैरवनाथ शुगर मिलचे असून येथे आमदार बर्याचदा बसत असत. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. याप्रसंगी तानाजी सावंत हे गद्दार असल्याच्या घोषणा दिल्या. ते इतर गद्दारांनाही हेच भोगावे लागणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिल्या.
त्या ठिकाणी तणावाचे वातावर दिसत आहे. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जमले असून तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत. तानाजी सावंत भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. 2014 साली शिवसेना भाजपच्या सत्तेत तानाजी सावंत यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असतील, असेही एकनाथ शिंदे यांनी ट्विटवरून म्हटले आहे.
राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आमदारांचे संरक्षण काढल्याचा आरोप केला होता. तसेच संरक्षण काढलेल्या आमदारांची नावेही दिली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/567976934880040/