मुंबई : आम्ही शिंदे गट अजूनही शिवसेनेत आहोत, आम्ही पक्षातून बाहेर पडलेलो नाही, असे दीपक केसरकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. ते शिंदे गटाची बाजू गुवाहाटीतील हॉटेलमधून ऑनलाईन मांडत होते. Shinde group is still in Shiv Sena, but what’s the point of joining BJP now – Deepak Keskar Politics
आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाही, आमच्या गटाचे कोणत्याही पक्षात विलिनीकरण होणार नाही, असे एकनाथ शिंदे यांच्या गटाने आज स्पष्ट केले आहे. या गटातर्फे दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण गटाची बाजू मांडली. आम्ही आजही शिवसेनेत आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीच्या विरोधात आहोत, असे केसरकर यांनी सांगितले आहे. पण नंतर आता भाजपमध्ये जायला काय हरकत, असा प्रतिसवाल उपस्थित केला.
‘आम्ही स्वतःहून हा निर्णय घेतला आहे, कुणाचाही आमच्यावर दबाव नाही, पक्षात आमचे ऐकले जात नव्हते, त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नाराजी व्यक्त केली’, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी. अन्यथा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमचा गट पुढील निर्णय घेईल, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/568365141507886/
सध्या शिंदे गट गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. दरम्यान, आज बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार दिपक केसकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
“आमच्याकडे आकडे आहेत. मात्र आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंविरोधात बोलणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवत आहे. हे आमदार कसं सहन करणार आहेत. शिवसेनेमुळे तुम्ही सत्तेत आला आणि आम्हालाच संपवायचा प्रयत्न करत आहात, असा सवाल दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.”
आम्ही सुरूवातीपासून उद्धव ठाकरे यांना सांगतोय की भाजपसोबत राहिलं पाहिजे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र राहतात. तेव्हाच राज्याचा विकास होतो. पंतप्रधानाचं मातोश्री आणि बाळासाहेब यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. आम्हाला भाजपच्या काळात ज्या अडचणी आल्या त्या उद्धव ठाकरेंना सांगितल्या तेव्हा ते फडणवीसांना बोलायचे तेव्हा कामं व्हायची, मात्र आता तसे होत नाही”, असे दिपक केसरकर म्हणाले.
□ आता भाजपमध्ये जायला काय हरकत ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा होती. पण, हा शिवसैनिक सामान्य कुटुंबातील व्हावा, असे बाळासाहेब ठाकरेंना वाटत होते, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
बंडखोर आमदारांच्या एकनाथ शिंदे गटात सामिल झालेले आमदार दीपक केसरकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हवे होते. त्यानुसार मुख्यमंत्री पदाची अडीच वर्षे पूर झाली आहेत. आता भाजपमध्ये जायला काय हरकत आहे, असा सवाल देखिल यावेळी केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत नैसर्गिक युती करावी, असेही दीपक केसरकर म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/568467091497691/