□ अग्निपथ योजना बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी : आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर : केंद्र सरकारची सर्वत्र टीका होणारी अग्निपथ योजना ही बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी आहे. या योजनेविरोधात आज काँग्रेसने रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. यावेळेस या योजनेतून युवकांना गाजर दाखवण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोपही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. Congress’s agitation in Solapur against the Agneepath scheme is a cruel joke
भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन जवळ येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित आंदोलकांच्या हाती लष्कराचे कंत्राटीकरण करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, देशाची संरक्षण व्यवस्था धोक्यात आणणारी अग्निपथ योजना रद्द करा, पूर्वीप्रमाणे सैन्य भरती सुरू करा, अश्या घोषणांचे फलक होते.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, अग्निपथ योजनेस आमचा विरोध आहे. अतिशय घृणास्पद योजना मोदी सरकारने आणली आहे. त्याच्याविरोधात देशभरातील युवक पेटून उठले आहेत, लाखो युवक सैन्य भरतीसाठी अनेक वर्षे तयारी करत असतात सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न युवकांचे असते. अनेक वर्ष त्यासाठी घालवतो आणि मोदी सरकार फक्त चार वर्षात आर्मी मध्ये ठेवून त्यांना इतर नोकरीचे गाजर दाखवून वाऱ्यावर सोडणार असल्याचा आरोप केला.
आधी सैन्यात काम केलेल्या लोकांना नोकरीत इतर ठिकाणी कामावर घेतले जायचे ग्रॅज्युएटी, इन्शुरन्स, प्रॉव्हिडंड फंड, पेन्शन असे अनेक योजनेतून सैनिकांना मदत व्हायचे आयुष्यातील महत्त्वाचे चार वर्षे देशासाठी घालवल्यानंतर मोदी सरकार कुठलीही मदत न देता फक्त काही रक्कम हातात देऊन त्यांना खाजगी नोकरीचे गाजर दाखवत आहेत. ही बरोजगार युवकांची क्रूर थट्टा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/568459794831754/
या अग्निपथ योजनेच्या विरोधात अनेक युवकांनी आत्महत्या केली तरीही निगरगट्ट मोदी सरकार युवकांचे प्राण गेले तरी ही योजना मागे घेण्याचे दिसत नाही. हे अतिशय निंदनीय आहे ही शोकांतिका आहे. अजून किती युवकांचे प्राण घेणार असल्याचा सवाल केला.
एक तर मोदी सरकारच्या आठ वर्षात एक सुद्धा जॉब निर्माण केला नाही जॉब लॉस झाला. केवळ एक दोन लोक या देशात मोठे झाले आहेत, अदानी अंबानी यांची संपत्ती एका दिवसात दहा पट होते पण युवकांच्या अकाउंट मध्ये पन्नास रुपये डिपॉझिट झाले नाहीत. कारण त्यांच्या त्यांना नोकरीच मिळाली नाही मग देश पुढे कसे जाणार? मोदी सरकार पूर्णपणे देशाची दिशाभूल करत आहेत. आता आगीतून फुफाट्यात अग्निपथ योजना आणली.
आपण अनेक राज्यात फिरले बिहार, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व इतर राज्यातील तरुण भरतीसाठी अनेक वर्षे रोज अहोरात्र मेहनत करत असतात. या सगळ्या युवकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यांना वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार करत आहे. याचा विरोध आपण सगळेजण मिळून करुया, जोपर्यंत ही अग्निपथ योजना मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून आंदोलन करणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
या धरणे आंदोलनात माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस अलका राठोड, किसन मेकाले, मनीष गडदे, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, अनुराधा काटकर, वैष्णवीताई करगुळे, फिरदोस पटेल, माजी महापौर आरिफ शेख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/568625041481896/