Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत गुरुवारी 15 मृत्यू, तर नव्याने 313 रुग्ण, कोरोना रुग्णसंख्या साडेपाचहजार पार तर मृत्यू 191
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगलीत गुरुवारी 15 मृत्यू, तर नव्याने 313 रुग्ण, कोरोना रुग्णसंख्या साडेपाचहजार पार तर मृत्यू 191

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 11:47 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : कोरोनाचा विळखा मनपा विभागामध्ये वाढू लागला आहे. 3 हजार 436 रुग्णसंख्या मनपा विभागात झाली आहे. पूर्वी रुग्ण संखेत ग्रामीण विभाग पुढे होता. आता मनपा विभागात वाढ झाली आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. सांगलीत गुरुवारी तब्बल १५ कोरोनाबळी तर नव्याने 313 रुग्ण आढळले. आता एकूण रुग्णसंख्या साडेपाचहजार पार झाली असून मृत्यूचा आकडा दोनशेच्या उंबरठ्यावर आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मनपा विभागाने ग्रामीण भागाला मागे टाकले आहे. सांगली जिल्ह्यात गुरुवारच्या अहवालानुसार 15 मृत्यू तर नव्याने 313 बाधित आढळले. अहवालानुसार 2 हजार 952 जणांनी कोरोना वर मात केली आहे. सांगली जिल्ह्यात एकूण बाधित 5 हजार 577 संख्या झाली असून, एकूण मृत्यू 191 झाले आहेत. उपचाराखाली 2 हजार 434 रुग्ण आहेत.

गुरुवारी सांगली जिल्ह्यात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुढील प्रमाणे – तालुकानिहाय रुग्णसंख्या आहे. आटपाडी 8, जत 5,कडेगाव 13,कवठेमहांकाळ 6, खानापूर 4,मिरज 16,पलूस 16,शिराळा 2,तासगाव 22,वाळवा 9,सांगली 118, मिरज 94 असा आहे.

गुरुवारच्या अहवालातील मृतांमध्ये मिरज येथील 65, 40, 68वर्षांचे पुरुष आणि 62 वर्षांची महिला. सांगलीवाडी येथील 55 वर्षांची महिला. तासगाव येथील 77, 71 वर्षांचे पुरुष. आष्टा येथील 75 वर्षांचा पुरुष. सांगली येथील 45, 60, 78 वर्षांचा पुरुष. इनाम वाडी येथील 54 वर्षांचा पुरुष.मालगाव येथील 78 वर्षांचा पुरुष. येथील 85 वर्षांची महिला असे आहेत.

तालुकानिहाय आजअखेर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आटपाडी 221, जत 212, कडेगाव 117, कवठे महांकाळ 198, खानापूर 103, मिरज 454, पलूस 183, शिराळा 239, तासगाव 174, वाळवा 240, मनपा 3 हजार 436 अशी आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सांगली #कोरोना #15मृत्यू #रुग्णसंख्या #साडेपाचहजारपार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पत्रकार राजा माने यांना मातृशोक; अनुसया माने यांचे निधन
Next Article राष्ट्रवादीच्या ‘मिशन घरवापसी’वर आशिष शेलारांची टीका; आधी आपले घर सांभाळा, नंतर भाजपावर बोला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?