Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संजय राऊतांच्या घरातच शिवसेना फुटली? आमदार भाऊ गुवाहाटीला जाण्याची चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

संजय राऊतांच्या घरातच शिवसेना फुटली? आमदार भाऊ गुवाहाटीला जाण्याची चर्चा

Surajya Digital
Last updated: 2022/06/26 at 9:47 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ शिवसेनेच्या दोन गटातील लढाई आता सुप्रीम कोर्टात, दोन याचिका दाखल□ देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत हे देखील गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने सुनिल राऊत नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  Shiv Sena split in Sanjay Raut’s house? Discussion of MLA brother Sunil Raut going to Guwahati Politics Goa

एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान, संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “माझे कुटुंब मेले तरी चालेल पण मी शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आमचा श्वास आहे. बोलणारे बोलू देत, जास्तीत जास्त काय होईल सत्ता, खासदारकी जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे संजय राऊत म्हणाले आहेत,” अशी स्पष्टोक्ती संजय राऊतांनी केली.

सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान, 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. पण, आता स्वतः संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

या चर्चा स्वतः सुनिल राऊत यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, माध्यमांनी चुकून गुवाहटी सांगितला असेल, मी खरंतर निसर्गप्रेमी, त्यामुळे गोव्याला जाणार होतो. तिकडे जावून त्यांची तोंड बघण्यापेक्षा मी गोव्याला जाईल. बाकीच्या बातम्या केवळ जाणून-बुजून पसरवल्या जात आहेत. लोकांना आणि तिकडे असलेल्या आमदारांना कन्फ्युज करत आहेत, की संजय राऊत यांचा भाऊही गुवाहटीला जात आहे. सुनील राऊत हा बाळासाहेबांचा सैनिक आहे. आम्हाला कापलं तरी शिवसेना आणि बाळासाहेब असतील. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि शिवसेना राहणार आहोत.

 

□ शिवसेनेच्या दोन गटातील लढाई आता सुप्रीम कोर्टात, दोन याचिका दाखल

 

मुंबई : शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाने 2 वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या आपात्रतेच्या नोटीसीविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, उद्धव ठाकरे गटाने अजय चौधरी यांची गटनेते पदी केलेली नियुक्ती अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षनुसार कोर्टात रंगणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशी विरोधात एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

 

□ देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय

देशात झालेल्या लोकसभेच्या व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर व आझमगड हे 2 लोकसभा मतदारसंघ भाजपने जिंकले आहेत. सपाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमधून भाजपच्या दिनेश लाल यादव निरहुआ यांनी अखिलेश यादव यांचे भाऊ धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला आहे. तसेच, त्रिपुरामध्ये भाजपने 4 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली आहे.

 

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #ShivSena #split #SanjayRaut's #house #Discussion #MLA #brother #SunilRaut #going #Guwahati #Politics #Goa, #संजयराऊत #घरातच #शिवसेना #फुटली #आमदार #भाऊ #सुनीलराऊत #गुवाहाटी #चर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेच्या दोन गटातील लढाई आता सुप्रीम कोर्टात, दोन वेगवेगळ्या याचिका दाखल
Next Article विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेचाही पर्याय ?

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?