सोलापूर : विहिरीच्या जागेची पूजा करताना पोकलँडचे बकेट डोक्यावर पडून करमाळा तालुक्यातील देवळालीत शेतकरी ठार झाला आहे. यात पोकलँड ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. Solapur Pokland bucket falls on head, kills farmer in Karmala, case filed against Pokland operator
करमाळा तालुक्यातील देवळाली येथे विहीर खोदण्याकरता जागेची पूजा करताना पोकलँडचे बकेट अंगार पडून विहीर मालक जागीच ठार झाला आहे. श्रीकृष्ण गुंड असे यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ठार झालेल्या शेतकऱ्याचा मुलगा संदीप श्रीकृष्ण गुंड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोकलँड ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गुंड यांच्या शेतात ५८/२/अ/१ येथे विहीरीचे काम करायचे होते. त्यासाठी पोकलँड मशीनच्या मदतीने विहीर खोदण्यासाठी विहिरीच्या जागेची पूजा करत असताना मशीनचे बकेट श्रीकृष्ण गुंड यांच्या डोक्यावर आणून उभा केले होते. हे बकेट पडल्याने त्यांचा जखमी होऊन मृत्यू झाला.
बकेट अंगावर पडून दुखापत होईल याची जाणीव असतानाही ऑपरेटरने डोक्यावरून बकेट आजूबाजूला केले नाही. ते बकेट वडिलांच्या अंगावर पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऑपरेटरविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक माहूरकर हे करत आहेत.
श्रीकृष्ण गुंड यांच्या शेतात विहिरीचे काम करायचे होते. त्यासाठी मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पोकलेन मशिनच्या मदतीने विहिर खोदण्यासाठी विहिरीच्या जागेची पूजा करत होते. याच दरम्यान पोकलेन मशिनचे बकेट श्रीकृष्ण गुंड यांच्या डोक्याच्या वरतीच होते. पूजा सुरु असताना अचानक हे बकेट गुंड यांच्या डोक्यावर पडले.
या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बकेट अंगावर पडून दुखापत होईल याची जाणीव असतानाही ऑपरेटरने डोक्यावरून बकेट आजूबाजूला केले नाही. ते बकेट वडिलांच्या अंगावर पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऑपरेटरविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माहूरकर हे करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/571339774543756/
□ विहीरीत पडलेल्या कुत्र्याला दिले जीवदान, एनिमल राहतच्या टीमची कामगिरी
सोलापूर : वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापूर व एनिमल राहत यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ फूट खोल विहीरीत पडलेल्या एका भटक्या कुत्र्याला जीवदान देण्याची सुखद घटना घडली आहे.
या घटनेची माहिती अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर साठे यांच्या ७५ फूट खोल विहिरीत एक कुत्रा पडला असल्याची माहिती नागेश ननवरे यांनी एनिमल राहतचे अजित मोटे यांना फोनद्वारे दिली. यानंतर वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापुरचे सुरेश क्षीरसागर व प्रवीण गावडे आणि एनिमल राहतची टीम बीबी दारफळकडे रवाना झाली. यानंतर साठे यांच्या शेतात दाखल झाल्यावर विहिरीची पाहणी केली असता बांधलेल्या विहीरीत खाली उतरण्यासाठी तारेच्या पायऱ्या ६० फुटापर्यंत आणि १५ फूट खोल भाग पायऱ्या नसलेला दिसून आला.
यानंतर वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापुरचे सुरेश क्षीरसागर, एनिमल राहतचे महेश क्षीरसागर हे दोघे जण तारेच्या पायऱ्या वरून विहीरीत खाली उतरले व खालच्या पायऱ्या नसलेल्या भागात हारनेसच्या साहाय्याने उतरुन विहीरीत पडलेल्या कुत्र्याला नेटच्या सहाय्याने पकडले. यानंतर त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला विहिरीतून वर काढले व पुढील उपचारासाठी एनिमल राहतकडे सुपूर्द केले.
या बचाव कार्यात वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापुरचे सुरेश क्षीरसागर, प्रवीण गावडे, एनिमल राहतचे डॉ. अनिकेत नावकर, अजित मोटे, सोमनाथ देशमुख, गणेश जावीर, महेश क्षीरसागर, शेतकरी ज्ञानेश्वर साठे, दत्तात्रय साठे हे सहभागी झाले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571276844550049/