नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांना संघटन कौशल्यामुळे बिहारमध्ये नवी जबाबदारी मिळू शकते. बिहारचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहू शकतात. केंद्रीय नेतृत्त्वाला त्याबाबत विश्वास वाटतो.
बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याबाबत केंद्रातील नेत्यांना विश्वास आहे. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये नवी जबाबदारी दिली जाऊ शकते.