मुंबई : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज मुंबईला येणार आहेत. विमानतळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.. तिथल्या गाड्या हटवण्याचं काम पोलिस करीत आहेत. गेट क्रमांक आठमधून ते बाहेर पडणार आहेत. एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट शिंदे घेऊ शकतात, त्यांनतर ते राज्यपालांची सुद्धा भेट घेणार आहेत. Z Security to Eknath Shinde, Shinde reaches Mumbai, 123 rooms in Taj Book Politics Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे अखेर मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. तब्बल 10 दिवसानंतर ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे यांच्या स्वागतासाठी काही कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले आहेत. दरम्यान शिंदे पहिल्यांदा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत. त्यानंतर फडणवीस- शिंदे राजभवन येथे जाणार आहेत.
भाजप एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणार आहे. आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल, याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571944814483252/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. सागर बंगल्यावर शिंदे – फडणवीसांची भेट होणार आहे. एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत आले आहेत. शिंदे-फडणवीस भेट होणार आहे, असे सांगितले जात आहे. पुढील राजकीय सत्ता समीकरणाबाबत चर्चा करणार आहेत. त्याआधी शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले असतानाच गोव्यात दाखल झालेल्या शिवसेना बंडखोर नेत्यांचा गट आज मुंबईत येणार नसल्याची माहिती आहे. एएनआयच्या बातमीनुसार भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला सध्या मुंबई मध्ये येऊ नका, असा निरोप दिला आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने आता बहुमत चाचणीसाठी मतदान आवश्यक राहिलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला तातडीने मुंबईत येण्याची आवश्यकता नाही. मुंबईच्या ताज प्रेसिडेन्सी मध्ये १२३ खोल्या बुक केल्या गेल्या असून येथेच एकनाथ शिंदे गटाचा मुक्काम असेल असे सांगितले जात आहे. मात्र शपथविधी बाबत नक्की निर्णय होईपर्यंत शिंदे गटाने मुंबईत येऊ नये असे आवाहन त्यांना केले गेल्याचे सांगितले जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571870904490643/