सोलापूर : वडकबाळ तांड्यावर राहणारा संजय भुताळी पुजारी (वय 39 रा. नाईक नगर तांडा, वडकबाळ ता.दक्षिण सोलापूर) याच्या खूनप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी भाग्यश्री महादेव भुई (वय 35 रा.नाईक नगर तांडा, वडकबाळ) या महिलेला अटक केली आहे. Mandrup police arrest woman in Solapur boiling water
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ तांड्यावर राहणारा संजय भुताळी व गावातील महिला भाग्यश्री भुई यांच्यात भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेले. यानंतर बुधवारी (ता. 29 जून) रात्री एका अज्ञात व्यक्तीने संजय भुताळी याच्या डोक्यात व कानावर लाकडाने जोरात मारले. व त्यानंतर दोरीने संजय याचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले होते.
घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय अधिकारी अमोल भारती मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व जागेवरच पंचनामा केला.
या प्रकरणी मृताचा भाऊ कन्नप्पा भुताळी पुजारी याने मंद्रुप पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. व संशयीत आरोपी म्हणून भाग्यश्री भुई या महिलेस अटक केली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या खून प्रकरणाबाबत लवकरच छडा लावण्यात येईल, असे सपोनि नितीन थेटे यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/572699507741116/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ दारूच्या नशेत पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले उकळते पाणी
सोलापूर : पत्नी माहेरी जात नसल्याच्या कारणाने पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी ओतल्याची घटना सोलापुरात येथे घडली आहे.
पंढरपूर तालुक्यातील आवे येथे ही घटना घडलीय. यात पती संतोष बनसोडे (रा. आवे, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बनसोडे (रा. आवे, ता. पंढरपूर) हे त्यांच्या पत्नी मनीषा (वय ३०, रा. आवे, ता. पंढरपूर) यांना मागील दोन महिन्यांपासून दारू पिवून शिवीगाळ, मारहाण करीत होते.
संतोष दारू पिवून आले. त्यांनी मनीषा यांना तू घर सोडून जा म्हणून शिवीगाळ केली. मनीषा झोपल्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास तिच्या चेहऱ्यावर संतोषने उकळते पाणी टाकले. त्यात मनीषाचा पूर्ण चेहरा भाजल्याने तिला सोलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तू या घरात रहायचे नाही, तू तुझ्या माहेरी महाळूंग – अकलूजला जा असे वारंवार म्हणून पत्नीला त्रास देत होते. हे सर्व बोलण्यासाठी पत्नीच्या शेजारी राहणारे मनीषाचे दीर सत्यवान धोंडीराम बनसोडे व त्याची पत्नी बायडाबाई सत्यवान बनसोडे हे सांगतात. ते मनीषाच्या नवऱ्यास वारंवार तिच्याबाबत वाईट सांगून तू बायकोला घरातून बाहेर काढ असे सांगत असतात, असे पत्नीने फिर्यादीत म्हटले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/572736971070703/