Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदारांनी व्हीप धुडकावला; शिवसेनेचे आणि शिंदे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

आमदारांनी व्हीप धुडकावला; शिवसेनेचे आणि शिंदे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

Surajya Digital
Last updated: 2022/07/03 at 10:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवड झाली. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. परंतु यामध्ये शिवसेनेने जारी केलेला व्हीपचे 39 बंडखोर आमदारांनी पालन केले नाही. त्यामुळे शिवसेनेने त्या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांना पाठवले आहे.  MLAs blow the whip; Letter of Shiv Sena and Shinde group to the Assembly Speaker

राज्यपालांच्या आदेशानुसार आज रविवारी (३ जुलै) विधानसभेचे विशेष अधिवेशन झाले. शिवसेनेने व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.

तर, शिंदे गटाकड़ूनही 16 आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. याबद्दल शिवसेनेने तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार दाखल केली. शिवसेनेची तक्रार सभागृहाच्या पटलावर घेतली आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली, पण विधानसभेच्या नियमानुसार पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्याच्या विरोधात जाऊन 39 आमदारांनी मतदान केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/574176307593436/

शिवसेनेमधील उर्वरित 16 आमदार कोणाचा व्हीप मान्य करणार? याकडे लक्ष होते. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे शिवसेना पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी बंडखोर 39 आमदारांनी पक्षादेश झुगारल्याचे पत्र दिलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी हे पत्र रेकॉर्डवर आणण्याची सूचना केली.

 

आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली. या 39 आमदारांनी व्हीप मोडून मतदान केले आहे. त्यामुळे आमचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.

 

तांत्रिक दृष्ट्या जे योग्य आहे, त्यानुसार कारवाई केली पाहिजे, असे सुनील प्रभू म्हणाले. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आमचा खरा गट असून, आम्ही बजावलेल्या व्हीपच्या विरोधात जाऊन शिवसेनेतील 16 आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केले आहे, अशी तक्रार शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी दिली आहे.

दरम्यान, आमदार अपात्रतेच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयमध्ये प्रकरण प्रलंबित आहे. 11 जुलैला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/574061317604935/

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #MLAs #blow #whip #Letter #ShivSena #Shinde #group #Assembly #Speaker, #बंडखोर #आमदार #व्हीप #धुडकावला #शिवसेना #विधानसभा #अध्यक्ष #पत्र #शिंदे #गट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नुपूर शर्मा पोस्ट समर्थनार्थ प्रकरणात झालेल्या हत्येत धक्कादायक खुलासा, आत्तापर्यंत सातजणांना अटक
Next Article उस्मानाबादला धाराशिव म्हणण्यावरून मारहाण, पाचजण जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?