मुंबई : शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली आहे. शिंदे सरकारच्या बाजूने 164 मतं पडली आहेत. शिरगणती करुन ही संख्या मोजण्यात आली. शिंदे गटातील 20 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. तो मात्र खोटा ठरला आहे. याउलट कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात असलेले आमदार संतोष बांगर यांनी आज शिंदे सरकारच्या समर्थनात मतदान केले. Shinde government wins majority test, Thackeray’s claim proved false; Tears in Eknath Shinde’s eyes
विधानसभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या डोळ्यात अश्रू आले. ‘आपण आयुष्यात खूप संघर्ष केला, शिवसेना आणि लोकांसाठी संघर्ष करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले’, असे शिंदे यांनी म्हटले. तसेच मुलांच्या अपघाताच्या आठवणीने शिंदे यावेळी भावूक झाले. त्यानंतर आपण खचून गेलो होतो, पण आनंद दिघेसाहेबांनी मला आधार दिला आणि मी जनतेच्या सेवेसाठी पुन्हा संघर्ष करण्यास उतरलो, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर सभागृहात अनेक नेत्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/574634940880906/
मात्र, यावेळी काही आठवणी सांगत असताना एकनाथ शिंदे प्रचंड भावूक झाले. इतकेच नाहीतर एक आठवण सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. एकनाथ शिंदे यांच्या पोटच्या दोन मुलांचा काळ झालेला आहे. त्यांची आठवण सभागृहात सांगत असताना एकनाथ शिंदेंना अक्षरशः रडू कोसळले. “मी वडील म्हणून कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला. शिवसैनिकांना कुटुंब मानलं. माझ्या आयुष्यात डोळ्यांसमोर दोन मुलं गेली. त्यावेळी आनंद दिघे यांनी मला आधार दिला,” असं सांगत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपले अश्रु आवरता आले नाहीत.
एकनाथ विधानसभेत बोलत होते. मी माझ्याकडे 50 आमदार निवडून आणेलच. पण मी आणि फडणवीस दोघे मिळून 165 नाही तर 200 आमदार निवडून आणू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, असं म्हणतात. पण, एवढ्या जणांना EDच्या नोटिसा पाठवल्या, पण कुणाला टाकलं का जेलमध्ये? नाही ना? कारण त्यांना ही लढाई प्रेमाने जिंकायची होती, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजप- शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली असून 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर भाजपच्या सहाय्याने सरकार बनले आणि अचानक शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आता बहुमत जिंकत उध्दव ठाकरेंच्या समोरील आव्हान अजून मजबूत केले आहे. या लढाईत महाविकास आघाडीची हार झाली असून त्यांना बहुमतात शंभरचा आकडाही पार करता आला नाही.
यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक सदस्यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली. याच गैरहजेरीचा मुद्दा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना म्हटलं, ‘या सभागृहाने शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास केला त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी या बाजूने मतदान केले त्यांचे आभार मानतो. पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो, असे म्हटले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574632507547816/