नवी दिल्ली : कोरोनाची लस कधी बनणार हा सर्व जगाला पडलेला प्रश्न आहे, मात्र मी तुम्हाला हा विश्वास देतो की जेव्हा कधीही कोरोनाची लस बनेल तेव्हा अगदी कमीत कमी वेळात त्याचे भरपूर उत्पादन करुन देशाच्या कानाकोपर्यातील गरजु पर्यंत पोहचवण्यात येईल यासाठी संंपुर्ण प्लॅनिंग व रुपरेषा तयार आहे.
भारत आज शनिवारी आपला 74 वा स्वातंंत्र्य दिवस साजरा करत असला तरी जागतिक महामारी कोरोनामुळे प्रत्येक जण लॉकडाउनमध्येच अडकून पडला आहे. या मुद्द्यावरुन आज पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना देशवासियांंना आधार दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवताच वेगाने प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याची रूपरेखा तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भारताकडे ज्याने वाकडी नजर करुन पाहिले, त्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. तर नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची आजपासून सुरुवात झाल्याची घोषणाही मोदींनी केली. पायाभूत सुविधांसाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.लवकरच देश या महामारीवर मात करुन पुन्हा एकदा पुर्व पदावर येईल आणि आपल्याला हे करुन दाखवायचे आहे.
पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंंटल्याप्रमाणे, देशात कोरोनावरील तीन लसींंची चाचणी सुरु आहे. या चाचण्या सध्या विविध टप्प्यात आहेत.जसा संशोधकाकडून हिरवा कंदील मिळेल तशी ती उपलब्ध केली जाईल. देशभरातील वैज्ञानिक या साठी दिवसरात्र राबत आहेत आणि लवकरच ही लस सापडेल असा विश्वास आहे.
दरम्यान, यंंदा पहिल्यांंदाच स्वातंत्र्यदिन हा आत्मनिर्भर या थीमवर आधारित साजरा केला जात आहे. देशाच्या संंरक्षणापासुन ते आरोग्यापर्यंत सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यावरच देश खर्या अर्थाने स्वतंत्र होईल असे म्हणत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांंनी व्होकल द लोकल या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
* देशवासियांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला. ‘जेव्हा भारत स्वावलंबी होईल तेव्हा आपल्याला खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. म्हणूनच आज आपण भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.’ अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी दिली.