Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, सत्तांतरानंतर विरोधी पक्ष म्हणून एनसीपी मोठा पक्ष
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, सत्तांतरानंतर विरोधी पक्ष म्हणून एनसीपी मोठा पक्ष

Surajya Digital
Last updated: 2022/07/04 at 8:06 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही घोषणा केली आहे. अजित पवार यांची निवड होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन केले. तसेच पवार यांची भाषणशैली उत्तम आहे, याची महाराष्ट्राला माहिती आहे, असे शिंदे यांनी आपल्या अभिनंदनाच्या भाषणामध्ये म्हटले आहे. Election of Ajit Pawar as Leader of Opposition, NCP as Opposition Party after independence

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ अजित पवारांनी मानले आभार□ ‘ईडीमुळे (एकनाथ, देवेंद्र) सरकार स्थापन झाले’

 

विरोधी पक्षनेते पदी अजित पवार यांची निवड झाली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करतो. यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जनतेचे मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचं काम आपण करू,” असे पवार म्हणाले.

शासनाकडून ज्या त्रुटी राहतील त्यावर बोट ठेवण्याचं काम अजित पवार करतील. त्यांचा अनुभव त्यांच्या उपयोगी पडेल. त्यांना अनेक खात्यांचा अनुभव आहे. ते अर्थमंत्री होते, प्रत्येक खात्यातील बारकावे समजण्यात त्यांना सुलभ होईल. अत्यंत समर्थपणे ते विरोधी पक्षाची बाजू मांडतील. योग्य मुद्यांना सहकार्यही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष झाला आहे. यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/574747210869679/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/574632507547816/

विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यंतीत अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. आज अखेरीस अजित पवार यांच्याच नावाला पसंती देण्यात आली. विश्वासदर्शक ठराव मतदान झाल्यानंतर अध्यक्षांना अजित पवार हेच विरोधी पक्षेनेते असतील असे पत्र देण्यात आले होते. मात्र त्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणानंतर करण्यात आली.

 

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी सातत्याने बारामतीचे आमदार म्हणून काम केले. त्यांनी बारामतीचे विकास मॉडेल विकसित केले आहे. अजित पवार यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अजित पवार यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते. मात्र शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वमान्य नेतृत्व होण्याची किमया केली, अशी भावना व्यक्त केली.

□ अजित पवारांनी मानले आभार

 

अजित पवार यांनी आपण विरोधासाठी विरोध करणार नाही, तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू अशा भावना व्यक्त केल्या. “महाराष्ट्राच्या विधानसभेला उज्ज्वल परंपरा आहे. त्यात विरोधीपक्ष नेत्याचीही परंपरा आहे. आमचा गट १९९० च्या बॅचचा होता. त्यापूर्वी १९८५ मध्ये बाळासाहेब थोरातांचा गट निवडून आला होता. पूर्ण बहुमत मिळून भाजप-शिंदे गट सत्तेत आले आहेत. लोकशाहीत ज्याप्रमाणे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असते, त्याप्रमाणेच विरोधीपक्ष नेतेपदही महत्त्वाचे असते. आपण आजवर अनेक नेत्यांना हे पद भूषवताना पाहिले आहे,`असे सांगत अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

 

□ ‘ईडीमुळे (एकनाथ, देवेंद्र) सरकार स्थापन झाले’

विधानसभेत शिंदे सरकारने 164 मते घेऊन बहुमताचा आकडा पार केला. शिंदे सरकार हे ईडीच्या मदतीने आले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मतदान सुरू असताना ईडी ईडी अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे. हो महाराष्ट्रात ईडीच्याच मदतीनं सरकार स्थापन केलंय. पण यामध्ये ‘E’ म्हणजे, Eknath Shinde आणि ‘D’ म्हणजे, Devendra Fadnavis. असे फडणवीस म्हणाले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/574525304225203/

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Election #AjitPawar #LeaderofOpposition #NCP #OppositionParty #independence #political, #अजितपवार #विरोधीपक्षनेते #पदी #निवड #सत्तांतर #विरोधीपक्ष #एनसीपी #मोठापक्ष #राजकारण #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली, ठाकरेंचा दावा ठरला खोटा; एकनाथांच्या डोळ्यात अश्रू
Next Article विश्वासदर्शक ठरावावेळी सोलापूरचे दोन आमदार परदेश दौ-यावर, काँग्रेसचे दहा आमदार गैरहजर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?