● देवेंद्र फडणवीसांनी गैरहजर आमदारांचे मानले आभार
मुंबई / सोलापूर : भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने आज सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. सरकारच्या बाजूने 164 आणि विरोधात 99 मते मिळालीत. तर 3 आमदार तटस्थ राहिलेत. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर सरकारने सभागृहात हा दुसरा विजय संपादित केला आहे. पण या महत्वपूर्ण वेळेस महाविकास आघाडीचे आमदार गैरहजर होते. पण या गैरहजेरीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले. Two MLAs from Solapur on foreign tour, ten Congress MLAs absent during the confidence motion
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय पटलावर मोठी चर्चा झाली. मात्र यावर आमदार बबनराव शिंदे हे परदेशातून मुंबईत परतत असल्याने ते विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत; तर आमदार प्रणिती या घरगुती कार्यक्रमात सहभागी असल्याने सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशी कारणं सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना म्हटलं, ‘या सभागृहाने शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास केला त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी या बाजूने मतदान केले त्यांचे आभार मानतो. पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो.
गैरहजेरीत काँग्रेस आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे. तर अण्णा बनसोडे, संग्राम जगताप, मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, नवाब मलिक, अनिल देशमुख, मुफ्ती इस्माईल, निलेश लंके, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते, माधवराव जवळगावकर हे गैरहजर होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574753930869007/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/574747210869679/
अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे उशिरा आले. त्यावेळी दरवाजा बंद करण्यात आलेले होते, त्यामुळे त्यांना बाहेरच थांबावे लागले. आमदार प्रणिती शिंदे या परदेशात न्यूयॉर्कमध्ये आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणी या दोन्हीवेळी अनुपस्थित होत्या. आमदार अंतापूरकर यांचे काल लग्न होते. त्यामुळे ते काल आणि आज गैरहजर होते. काल कुणाल पाटील हजर होते. पण, आज ते अनुपस्थित होते.
आमदार नीलेश लंके यांनी दिले आजारपणाचे कारण दिले. मालेगाव मध्य मतदार संघातील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद गैरहजर राहिले. आमदार बबनराव शिंदे हे परदेशातून मुंबईत परतत असल्याने ते मतदानासाठी सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत, तर आमदार प्रणिती शिंदे या घरगुती कार्यक्रमात सहभागी असल्याने सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशी कारणे सांगण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि नगरचे आमदार संग्राम जगताप हेही आज अनुपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारची एकूण नऊ मते कमी झाली आहेत. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे मत नव्हते. आज त्यांची गणना झाली. दरम्यान, बहुमत चाचणी जिंकल्यानंतर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी भारत माता की जय, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.
शिंदे सरकारने आज बहुमत चाचणी जिंकली. मात्र महाविकास आघाडीला शंभरीचा आकडाही पार करता आला नाही. आघाडीचे काही सदस्य उशीरा पोहोचल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यात अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झीशान सिद्दीकी, धीरज देशमुख, संग्राम जगताप यांचा समावेश आहे. दरम्यान, ज्यांनी अप्रत्यक्षपणे हा ठराव मंजूर व्हावा याकरता बाहेर राहून अदृश्यपणे मदत केली त्यांचे आभार मानतो असे फडणवीस म्हणाले.
● विश्वासदर्शक ठराव- ‘हे’ आमदार उपस्थित नव्हते
1. अशोक चव्हाण, काँग्रेस 2. विजय वडेट्टीवार, काँग्रेस.
3. प्रणिती शिंदे, काँग्रेस 4. झीशान सिद्दिकी, काँग्रेस.
5. धीरज देशमुख, काँग्रेस 6. अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी.
7. संग्राम जगताप, राष्ट्रवादी. 8. जितेश अंतापुरकर, काँग्रेस.
9. कुणाल पाटील, काँग्रेस 10. मुक्ता टिळक, भाजप ( आजारी).
11. लक्ष्मण जगताप, भाजप (आजारी).
12. नवाब मलिक, राष्ट्रवादी (जेलमध्ये).
13. अनिल देशमुख, राष्ट्रवादी (जेलमध्ये). 14. मुफ्ती इस्माईल, एमआयएम.
15. निलेश लंके, राष्ट्रवादी. 16. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी.
17. दिलीप मोहिते, राष्ट्रवादी. 18. राजू आवळे, काँग्रेस.
19. मोहन हंबर्डे, काँग्रेस. 20. शिरीष चौधरी, काँग्रेस.
* तटस्थ 1. रईस शेख, सपा 2. अबू आझमी, सपा.
3. शाह फकुर अन्वर, एमआयएम.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574525304225203/