Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदेच्या गोटात? चर्चा गुलदस्त्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदेच्या गोटात? चर्चा गुलदस्त्यात

Surajya Digital
Last updated: 2022/07/05 at 2:36 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ चर्चा गुलदस्त्यात□ धनंजय मुंडे यांनी नार्वेकरांना अध्यक्ष म्हणून उच्चारले, परत सांगितले कारण

मुंबई : उद्धव ठाकरे यांची सावली म्हणून ओळख असलेले मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल अनेक चर्चा सध्या सुरु आहेत. नुकतीच नार्वेकर यांची एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत विधिमंडळ परिसरात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत बंडखोरांसोबत संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. Thackeray’s confidant Milind Narvekar in Shinde’s group? In the discussion bouquet

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत शिवसेना ही सध्या तरी पूर्णपणे खिळखिळी झाल्याचं दिसतंय. अशावेळी पक्षाला जे मोठं भगदाड पडलं आहे ते नेमकं बुजवायचं कसं असा यक्ष प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पडलं आहे. अशावेळी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे उद्धव ठाकरे हे अधिकच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी अतिशय अनपेक्षितपणे आपल्याच पक्षातील ४० आमदारांना फोडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद देखील सोडावं लागलं. हा बंड येथवरच न थांबता पुढे ही बंडाळी वाढतच गेली. एक-एक करून त्यांचे अनेक जवळचे लोक उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत. आता या गळतीला थोपवणं खूप कठीण जात आहे. अगदी परवापर्यंत उद्धव ठाकरेंसाठी अश्रू ढाळणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनीसुद्धा काल अचानक विश्वासदर्शक प्रस्तावावेळी शिंदे गटात सामील झाले. त्यांनी तर बंडखोरी करणा-या आमदाराच्या बायका पळून जातील, असै म्हटल्याची माहिती आहे.

या सगळ्यात आता शिवसेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो धक्का म्हणजे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. ही चर्चा कुठे इतरत्र झाली नसून विधानसभेच्या आवारातच झाली आहे. यामुळेच सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/575201280824272/

 

□ चर्चा गुलदस्त्यात

या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. एकीकडे शिंदे विरुद्ध ठाकरे असं राजकीय युद्ध सुरु असताना उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना श्रीकांत शिंदेशी चर्चा करण्याची गरज का पडली? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

 

एकीकडे एकेक विश्वासू सहकारी हे उद्धव ठाकरे यांना सोडून जात असताना आता मिलिंद नार्वेकर हे काही वेगळी भूमिका घेतात का? याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा सुरतला जावून फडकावला होता. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांनाच सूरतला पाठवलं होतं. मात्र, तिथे जाऊन आणि चर्चा करुन नार्वेकरांच्या हाती काहीही लागलं नव्हतं. त्यांना हॉटेल बाहेर ताठकळत ठेवलीची बातमी आली होती. त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.

 

एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हे सुरुवातीपासूनच एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. या दोघांचेही पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. अशावेळी हे दोन्ही पुन्हा जवळ आल्यास उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का बसू शकतो. मात्र, सध्या तरी याबाबत फक्त राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. पण मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंपासून दूर झाल्यास त्यांना मोठा धक्का बसू शकतो.

 

दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेत जी काही बंडं झाली त्या-त्यावेळच्या नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आपण शिवसेना सोडत असल्याचा आरोप केला आहे. पण आता तेच मिलिंद नार्वेकर हे स्वत: तर बंडखोरीच्या तयारीत आहे का, असा सवाल या सगळ्या घडामोडीनंतर अनेक जण उपस्थित केला जात आहे.

 

□ धनंजय मुंडे यांनी नार्वेकरांना अध्यक्ष म्हणून उच्चारले, परत सांगितले कारण

 

विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची गडबड झाली. ‘सन्माननीय मिलिंद नार्वेकर साहेब’ हे वाक्य धनंजय मुंडे यांनी उच्चारल्यानंतर समोरच्या बाकावरील सदस्यांनी ‘राहुल राहुल’ असा आवाज करून विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर नव्हे तर राहुल नार्वेकर झाल्याचे मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुंडे यांनी स्वताला सावरत दुरूस्त करून घेतले.

विधानसभा अध्यक्षांच्या नावाची गफलत झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या भेटीची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला. ‘माझी आणि आदित्यजी यांची सकाळी लिफ्टमध्ये भेट झाली. याला कारण व संदर्भही तसा आहे. आपण उपमुख्यमंत्री झाल्यावर मी अभिनंदन करायला आलो होतो. त्याच दरम्यान मिलिंदही गेले होते, असे आदित्य यांनी आपणास सांगितले. कोण पुढच्या दाराने गेले, कोण मागच्या दाराने गेले म्हणून तेच लक्षात राहिले’, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/575189117492155/

 

You Might Also Like

Стратегия торговли: Ретесты

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

TAGGED: #Thackeray #confidant #MilindNarvekar #Shinde's #group #discussion #bouquet, #ठाकरे #विश्वासू #मिलिंदनार्वेकर #शिंदे #गोटात #चर्चा #गुलदस्त्यात #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वारकरी वेशभूषेत कलेक्टर, सिईओ अन् एसपी…!, हरीत वारीमुळे वारकरी व विश्वस्त सुखावले…!
Next Article Kaali हिंदू देवतांचा अपमान, महिला फिल्ममेकरवर कारवाईची मागणी

Latest News

Стратегия торговли: Ретесты
Top News November 28, 2025
तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?