मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी शिंदे हे मध्यरात्री 12 च्या सुमारास पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमाविना ही भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. Meeting of Chief Minister Eknath Shinde and Sharad Pawar without pre-arranged program
दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी पवारांना दिलेली ही अनौपचारिक भेट होती असं सांगण्यात आलं आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. शरद पवार यांची भेट त्याचाच एक भाग होता, असे सांगितले जाते.
एकनाथ शिंदेच्या तगड्या बंडानंतर उध्दव ठाकरेंचे सरकार कोसळले. या महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या चाणक्यनितीला हा मोठा धक्का मानला गेला जात आहे. यात शरद पवारांनी नविन सरकार सहा महिन्यात पडणार असे म्हटले होते. त्यावर एकनाथ शिंदेनी काही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र मंगळवारी मध्यरात्री अचानक एकटे शरद पवारांना भेटले. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.
तुफान पावसातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीसाठी कोणताही लवाजमा न घेता एकटे 12 च्या सुमारास सिलव्हर ओकवर आले होते. शिंदेनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले आले आहे मात्र ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/575694784108255/
काल मंगळवारी दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. या भेटीवेळी एकनाथ शिंदेंसोबत कुणीही अन्य बडा नेता नव्हता, अशी माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला होता. तसेच त्यानंतर धन्यवाद प्रस्तावावर केलेल्या भाषणातून सडेतोड भाषण करत आपल्यावरील आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेले हे भाषण खूप गाजले. तसेच राजकीय वर्तुळातही या भाषणाची चर्चा होत आहे.
दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आलेले सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासमत प्रस्ताव जिंकल्यानंतर शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल, असा दावा केला होता. शरद पवार यांच्या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही तशीच विधाने केली आहेत. त्यांचीच एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याने चर्चा होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/575683537442713/