सोलापूर – स्वागत नगर परिसरातील भट्टी जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात एका विवाहित तरुण संशयास्पद मयतअवस्थेत आढळून आला. ही घटना सोमवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली. Suspected death of married youth in Solapur, Strangulation suicide theft
शौकतअली युनूस डांगे (वय २४ रा. स्वागतनगर, कुमठा नाका) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रात्री कामावरून घरी आला. जेवण करून तो ९ वाजेच्या सुपारास दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. केंगनाळकर वीटभट्टी जवळच्या मोकळ्या मैदानात तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला गणेश बावडेकर (मित्र) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मयत शौकतअली हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याच्या मृत्यू संशयात पद असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीसात झाली आहे.
□ ब्रह्मदेव नगर येथे गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – मजरेवाडी परिसरातील ब्रह्मदेव नगर येथे राहणाऱ्या अब्दुल हुसेनसाब शेख (वय ३५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
शनिवारी (ता. २) रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह छताच्या लोखंडी हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचार यापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार सोनार पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/576079287403138/
□ रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
सोलापूर – रेल्वेची रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने नागनाथ घोसु काळे (वय ३५ रा. कल्याण नगर भाग ५, महादेव मंदिराजवळ) हा तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला ही घटना. काल सोमवारी रात्रीच्या सुमारास मजरेवाडी रेल्वे ब्रीज जवळ घडली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली. हवालदार बहिर्जी पुढील तपास करीत आहेत.
□ घरात झोपलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटून चोरटा दुचाकीवरून झाला पसार
सोलापूर – घरात झोपलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन चोरटा दुचाकी वरून पसार झाला ही धाडसी चोरीची घटना आंधेवाडी (ता. अक्कलकोट) येथे काल सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
आंधेवाडी (ता.अक्कलकोट) येथील मुन्नाबी रसूल नदाफ ही विवाहित आपल्या मुलासह जेवण करून रविवारी रात्री घरात झोपली होती. तिचा पती अंगणात झोपल्याने तिने दरवाजा पुढे केला होता. पहाटे ३ वाजेच्या सुमारास तिच्या गळ्याला स्पर्श झाल्याने तीला जाग आली. तेंव्हा तीच्या समोर चोरटा उभा होत.काही कळण्याचा आतच त्याने तिच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून घेऊन पसार झाला.
जाण्यापूर्वी त्याने तिच्या पतीच्या उशाखालचे मोबाईल देखील पळविले होते. तिने आरडा ओरड करीत पाठलाग केली. तेंव चोरटा काही अंतरापर्यंत जाऊन त्याच्या सोबत आलेल्या साथीदाराच्या दुचाकीवरून दुधनीच्या दिशेने प्रसार झाला . त्यानंतर मुन्नाबी नदाफ हिने अक्कलकोट दक्षिण पोलिसात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/576077554069978/