मुंबई : आज आपल्या देशाचा 74 व्या स्वातंत्र्यदिन. कोरोनाच्या संकटाशी सामना करत यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदा नियमांचे पालन करून ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. कोविड योद्धे डॉक्टर, नर्सेस तसंच वैद्यकीय सहायक, कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ध्वजारोहण झाल्यानंतर भेटले व त्यांचे कौतुक केले.