सोलापूर : सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काय डोंगर, काय झाडी अन् काय हाटील हा त्यांचा डायलॉग चांगलाच गाजला. त्यानंतर आता त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. एका कार्यकर्त्याने पाटील यांना कडाडून मिठी मारली. तसेच त्यांचा चक्क मुकाच घेतला. राजू ओसवाल असं कार्यकर्त्याचं नाव असल्याचं समजतं. तसेच तो पुण्यातील एक उद्योजक आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. Shahajibapu of Solapur in discussion again, Pappi taken by activist, photo goes viral
काय डोंगूर, काय झाडी काय हॉटेल, हे बापूंचं रांगडेपण नेटकरेंना भरभरून भावलं. त्यामुळेच बापूंवर अनेक गाणी रचली गेली, मीम्स बनल्या नुसता नेटकरेंच्या क्रिएटिव्हिटीचा महापूर आला. पण आता हेच बापू पुन्हा एकदा व्हायरल व्हायला लागलेत. आणि त्याला कारण ठरलंय त्यांचा एक कार्यकर्ता, कार्यकर्त्यांना बापूंना बघितलं आणि थेट पप्पी घेतली. हा फोटो आता सोशल मीडियावर वाऱ्यासरखा फिरतोय.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/577175413960192/
आपल्या कार्यकर्त्याचं आपल्या नेत्यावर प्रेम असावं अशी अपेक्षा प्रत्येकच नेत्याला असते. त्यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले आणि तेच पुढे मोठे राजकारणी झाले. बापूंचाही असाच एक जबरा फॅन आज बापूंना भेटला. बापू आता इंटरनेटवर गेल्या काही दिवसात जाळ अन् धूर संगटच काढत आहेत म्हणल्यावर या कार्यकर्त्याला बापूंना पाहून तेवढं आप्रुप तर वाटणारच. या कार्यकर्त्यानं बापूंना बघितलं तसं जाऊन कडाडून मिठी मारली. या कार्यकर्त्यांना बापूंच्या डायलॉगची एवढी भुरळ पडलीय की कार्यकर्ता स्वतःच्या भावना आवरू शकला नाही, मुंबईमध्ये एका कार्यकर्त्यानं बापूंचा चक्क मुकाच घेऊन टाकला. राजू ओसवाल असं या कार्यकर्त्याचं नाव असून तो पुण्यातला एक उद्योजक असल्याची माहिती समोर आली.
● बापू इंटरनेटच्या मार्केटमध्ये पुन्हा फार्मात
एवढा भन्नाट प्रकार आणि एवढा भन्नाट नजरा बघितल्यावर पुन्हा नेटकरेंच्या क्रिएटिव्हिटीला धुमारे फुटले. नेटकर यांनी थेट दादा कोंडकेंच्या मुका घ्या मुका चित्रपटातले कॅप्शन देऊन बापूला सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल करायला सुरू केली. पावसाळ्यात जेवढा पाऊस बरसला नसेल तेवढ्या या फोटोवरती कमेंट आणि लाईक लाईकचा पाऊस पडायला लागलाय. त्यामुळे मागे एका डायलॉगनं चर्चेत आलेले बापू इंटरनेटच्या मार्केटमध्ये पुन्हा फार्मात आलेत. असा प्रकार घडणं म्हणजे नेटकऱ्यांसाठी ही आयती मेजवाजवानीच आहे. त्यामुळे आता यावरही हजारो मीम्स बनू लागले आहेत. त्यामुळे शाहाजी बापु पाटीलही कायम ट्रेंडिंगमध्ये आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/577404213937312/