Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुरसाळे येथे विचित्र अपघात; ट्रक खाली चेंगरून तरुण ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

गुरसाळे येथे विचित्र अपघात; ट्रक खाली चेंगरून तरुण ठार

Surajya Digital
Last updated: 2022/07/09 at 5:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ दुचाकी चालकावर गुन्हा : पोलिसांना देखिल मारहाणस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ दुचाकी चालकावर गुन्हा : पोलिसांना देखिल मारहाण

सोलापूर – वेगाने जाणाऱ्या दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली. यावेळी एका दुचाकी वरील तरुण समोरून जाणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली चेंगरून ठार झाला. मात्र संतप्त जमावाने ट्रक चालकाला मारहाण केली. पोलीस आल्यानंतर अपघाताचा खरा प्रकार उघडकीस आला. Bizarre accident at Gursale; Young man killed by truck crash in Solapur

पोलीसांनी ट्रक चालकाची सुटका केली. आणि दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा विचित्र अपघात गुरसाळे (ता.नातेपुते) येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला.या अपघाताच्या वेळी मदतीसाठी आलेल्या पोलिसांना नागरिकांनी मारहाण केली. त्यांच्यावर देखील पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पप्पू दत्तात्रय सावंत (रा.धर्मपुरी) असे मयत झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या सोबत असलेल्या गजानन बापू ढोबळे (वय २८ रा.धर्मपुरी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मयत पप्पू सावंत गजानन ढोबळे यांच्या दुचाकी पाठीमागे बसून प्रवास करीत होता गुरुवारी (ता. ७) रात्री आठ वाजेच्या सुमारास दोघे स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळ आले असता समोरील ट्रकला ओव्हरटेक करून पुढे निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकी चालकाला अडकल्याने दोघेही खाली पडले. त्यात पप्पू सावंत ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन जागी मरण पावला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

अपघात झाल्यानंतर ट्रक चालत जागेवर थांबला होता. त्यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रक चालकास बेदम मारहाण केली. याची अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेपुते पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ट्रक चालकाची सुटका केली.

पोलिसांनी अविष्कार काटकर (रा. धर्मपुरी) यांच्या फिर्यादीवरून मयताच्या जोडीदार गजानन ढोबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला या अपघाताच्या तपास हवालदार तळेकर हे करीत आहेत.

 

□ पोलिसांना मारहाण, चौघाविरुद्ध गुन्हा

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्यातील हवालदार नितीन सदाशिव तळेकर आणि त्यांचे सहकारी अपघात स्थळी दाखल झाले. त्याठिकाणी नागरिक ट्रक चालकास मारहाण करीत होते. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असता जमावाने पोलिस आणि त्यांचा वाहनावर दगडफेक करून हवालदार नितीन तळेकर यांना मारहाण केली.

जखमी तळेकर यांच्या फिर्यादीवरून नातेपुते पोलिसांनी संतोष उर्फ बिरुदेव झेंडे, सुरज विकास सावंत, विकास शिवाजी जाधव आणि गजानन बाबू ढोबळे (सर्व रा.धर्मपुरी ता.माळशिरस) या चौघाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास हवालदार रनवरे करीत आहेत .

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Bizarre #accident #Gursale #Youngman #killed #bytruck #crash #Solapur, #गुरसाळे #विचित्र #अपघात #ट्रक #चेंगरून #तरुण #ठार #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article येत्या 5 वर्षात पेट्रोलवर बंदी घालणार – नितीन गडकरी
Next Article gold crown नांदेडच्या व्यापा-याकडून श्री विठ्ठल – रूक्मिणी मातेसाठी दोन किलो सोन्याचे मुकुट

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?