औरंगाबाद : औरंगाबाद आणि ऊस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांनी नाराजी दाखवली आहे. निर्णय घेताना चर्चा होणं अपेक्षीत होत पण ती झाली नाही, असं पवार म्हणाले आहेत. तसेच घेतलेल्या निर्णयाची मला पूर्वकल्पना नव्हती असं सुध्दा पवार म्हणाले आहेत. यावर महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्याची प्रतिक्रीया अजून आलेली नाही. मविआ सरकारचा शेवटचा निर्णय हा नामांतराचा होता. Sharad Pawar upset over naming Aurangabad as Sambhajinagar Osmanabad Dharashiv, Eknath Shinde did not meet, no need to slander
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराबद्दल त्यांची भूमिका मांडली. यावेळी शरद पवार हे ठाकरे सरकारच्या नामांतराच्या निर्णयावरुन खूश असल्याचे दिसले नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना नेते अनिल परब यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणताही विरोध केला नाही, त्यांनी याचं समर्थन केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. पण आता यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. त्यांनी हा निर्णय घेताना कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा केला. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला आणि नंतर आपल्याला समजल्याची माहिती त्यांनी दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578913557119711/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/578984333779300/
“नामांतराच्या निर्णयाबद्दल सुसंवाद नव्हता. नामांतराचा निर्णय घेणार, याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर त्याबाबत आम्हाला समजले. तसेच, तीनही पक्षाच्या किमान समान कार्यक्रमाचा हा भाग नव्हता. परंतू, मंत्रिमंडळात असल्याने आम्हाला तो निर्णय मान्य करावा लागणार. तरीही यापेक्षा इतर अनेक मुलभूत प्रश्न, समस्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या ठिकाणी आहेत. त्या मिटवणे आवश्यक होतं”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
मुख्यमंत्री शिंदे आणि आपल्या भेटी दरम्यान काय बोलणे झाले याबाबत विचारता, एकनाथ शिंदे मला येऊन भेटले नसल्याचे पवार म्हणाले. व्हायरल झालेला तो फोटो जुना आहे. उगाच कोणाचीही बदनामी करणे योग्य नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे. याशिवाय पवार यांनी इतरही विषयांवर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत मध्यावधी निवडणुका होतील, असे पवार म्हणाल्याच्या बातम्या आल्या होत्या,
त्यावरही त्यांनी खुलासा केला आहे, ‘मध्यावधी निवडणुका लागतील असे मी बोललो नाही. निवडणुकांसाठी आपण तयार असले पाहिजे असे मी कार्यकर्त्यांना म्हणालो होतो’. ‘औरंगाबादच्या नामांतराबाबत सुसंवाद नव्हता, नामांतराचा निर्णय घेणार याबाबत माहिती नव्हती.
□ ‘खरी शिवसेना कोणाची?
‘खरी शिवसेना कोणाची? हे उद्या कोर्टचं ठरवेल. कारण दोघेही म्हणतात शिवसेना माझीच. या प्रकरणातून मी एकदा गेलेलो आहे. आम्हाला भाजपची कोणतीही ऑफर नव्हती. ऑफर असण्याचे कारणच नव्हते. महाविकास आघाडी एकत्र लढावी, अशी माझी इच्छा. पण अजूनही एकत्र लढण्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.’ असेही पवार म्हणाले.
□ चमत्कारिक राज्यपाल, जादा बोलणार नाही
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, “आम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी राज्यपालांकडे मागणी केली होती, ती काही त्यांनी मान्य केली नाही. त्यांच्याकडे बहुतेक खूप काम असेल. पण दुसरं सरकार आलं आणि त्यांनी ही मागणी 48 तासामध्ये मान्य केली. हे असं करणारे आपले पहिलेच राज्यपाल असतील.”
आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदाची प्रतिष्ठा जपणारे राज्यपाल मिळाले होते. हे आताचे जरा चमत्कारिक राज्यपाल आहेत, पण राज्यपाल असल्याने मी त्यांच्यावर जास्त काही बोलणार नाही असा टोला शरद पवारांनी लगावला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578924123785321/