Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ग्लोबल टिचर डिसले गुरुजींचा राजीनामा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

ग्लोबल टिचर डिसले गुरुजींचा राजीनामा

Surajya Digital
Last updated: 2022/07/12 at 10:03 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – आरक्षण सोडत स्थगित, निवडणुका पुढे जाणार

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. राजीनाम्याचे कारण समोर आलेले नाही. राजीनामा अर्जात त्यांनी काहीच कारण नमूद केलेले नसल्याचे समोर आले आहे. Global Teacher Ranjit Singh Disley Guruji resigns

 

शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजी यांच्यातील वादातूनच त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी 3 महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. ७ जुलैला त्यांनी राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आला आहे.

यानंतर आता अचानकपणे त्यांनी राजीनामा दिल्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी दिलेला राजीनामा रद्द करण्याची अथवा मागे घेण्याची मुदत तीन महिने असते. त्यामुळे आता शिक्षणविभागाची याबद्दल काय भूमिका असेल आणि डिसले राजीनामा परत घेणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर ॲवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.

 

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवला. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवला होता.

 

कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. पण, त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा मिळाली. त्याचवेळी त्यांनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले. त्यावेळी त्यांनी माफीनामा दिला होता.

 

क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत करणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षांपूर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला. आता शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला आहे. त्यातूनच हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/580081433669590/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – आरक्षण सोडत स्थगित, निवडणुका पुढे जाणार

 

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीचा आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. Global Teacher Ranjit Singh Disley Guruji resign

 

एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

ज्या ठिकाणी निवडणूक अधिसूचना निघालेली आहे त्यात आता हस्तक्षेप होणार नाही. पण ज्या ठिकाणी अधिसूचना निघालेली नाही, तिथे मात्र तूर्तास कुठली नवी अधिसूचना नको. मंगळवारी 19 जुलैला आम्ही या सगळ्याबाबत पुढची सुनावणी करु असं कोर्टानं म्हटलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/580236030320797/

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Global #Teacher #RanjitSinghDisley #Guruji #resigns, #ग्लोबल #टिचर #डिसले #गुरुजी #राजीनामा #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – आरक्षण सोडत स्थगित, निवडणुका पुढे जाणार
Next Article सोलापुरात ऑनलाईन मागवल्या बारा तलवारी, 11 जणांवर गुन्हा, 9 जणांना अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?