Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘दामाजी’च्या अध्यक्षांना दिला पराभवाचा उतारा; भाजपच्या आमदाराचे भाजपवाल्यांनीच केला पराभव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

‘दामाजी’च्या अध्यक्षांना दिला पराभवाचा उतारा; भाजपच्या आमदाराचे भाजपवाल्यांनीच केला पराभव

Surajya Digital
Last updated: 2022/07/15 at 11:58 AM
Surajya Digital
Share
8 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ विजयी उमेदवार…□ भाजपचे आमदार विरुध्द भाजपचे पदाधिकारी□ संस्था मतदार संघातून सिद्धेश्वर आवताडे विजयी□ नियोजनबद्ध मतमोजणी□ मतमोजणीच्या तिसर्‍या फेरीअखेर समविचारी गटाचे विमान सुसाट□ गटनिहाय उमेदवारास तिसर्‍या फेरीअखेर पडलेली मते

मंगळवेढा/ सोलापूर : सलग सहा वर्षे अध्यक्षपदाचा हंगाम पूर्ण केल्यानंतरही दुसऱ्या हंगामात अध्यक्षपदासाठी नशीब अजमावणारे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे संत
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपवाल्यांनीच एकत्र येऊन तयार केलेल्या समविचारी आघाडीने गाळप (पराभव) केले. The president of ‘Damaji’ was given a recipe for defeat; The BJP MLA was defeated by the BJP members themselves

 

सभासदांनी त्यांनाच पहिल्यांदा पराभवाचा उतारा देऊन कारखान्याबाहेर काढले. पहिल्या फेरीतच त्यांना पराभवाचा पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर उर्वरित तिन्ही फे-यांमध्ये हप्त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत पराभवाचा अंतिम हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला. असल्याचे मतमोजणीअंती स्पष्ट झाले आहे.

बंद पडलेला संत दामाजी सहकारी साखर कारखाना चालू करणारे कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष कै. चरणूकाका पाटील यांचा एकहाती पराभव करुन आवताडे यांनी कारखान्याची सत्ता मिळवून स्वतः अध्यक्ष झाले होते. त्यावेळी फक्त चरणूकाका पाटील वगळता त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव आवताडे यांनी केला होता, तेव्हापासून सलग सहा वर्ष आवताडे हे कारखान्याचे अध्यक्ष होते. कोरोना महामारीनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यानी अन्य पक्षातील नेत्यांना एकत्र करून भाजपचेच आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात समविचारी आघाडी तयार केली.

 

मंगळवारी तालुक्यातील १०८ मतदान केंद्रावर 28695 पैकी २४५२१ मतदारांनी हक्क बजावत चुरशीने मतदान केले. या आघाडीनेच आ. आवताडे यांना पराभवाची धूळ चारली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ विजयी उमेदवार…

 

विद्यमान संचालक अशोक केदार हे पुन्हा बिनविरोध निवडले गेले असून मतमोजणीत तानाजी खरात सर्वाधिक मताने विजयी झाले. समविचारी गटातून तानाजी खरात, शिवानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्ष गोपाळ गो जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर बाडदेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडापा बिराजदार तालु सरचिटणीस दिगंबर भाकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील, भारत बेदरे, माजी सभापती निर्मला काकडे, लता कोळेकर, चरणुकाकाचे वारसदार राजेंद्र पाटील, महादेव लुगडे, माजी संचालक बसवराज पाटील, भिवा दौलतडे, मुरलीधर दत्तू, दयानंद सोनो रेवणसिद्ध लिगाडे तानाजी काळे हे विजयी झाले आहेत.

 

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये समविचारे गटाचे सर्व उमेदवार तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवरच राहिले. संस्था मतदारसंघातून सिद्धेश्वर अवताडे मोठ्या फरकाने विजयी झाले तर धनगर समाजाचे नेते तानाजी खरात हे देखील मोठ्या फरकाने आघाडीवर होते.

 

दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर होताच आघाडीवर असलेल्या गटाच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जल्लोष साजरा केला. तीन फेऱ्यांमध्ये समविचारी गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले धनगर समाजाचे नेते तानाजी खरात सर्वच आघाडीवरील उमेदवारात आघाडीवर होते. चौथ्या फेरीनंतर विजयी उमेदवाराचे मताधिक्य स्पष्ट झाले.

 

संस्था वाचवण्याच्या दृष्टीने दामाजीची निवडणूक सभासदांनी हातात घेतली होती. ऊस उत्पादक सभासदांचा उस वेळेत गाळप न करणे, कामगारांच्या पगारी न देणे या सर्वाच बाजूने सत्ताधा-यावर रोष होता, तो रोष त्यांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे समविचारी आघाडी प्रमुख शिवानंद पाटील यांनी सांगितले.

 

□ भाजपचे आमदार विरुध्द भाजपचे पदाधिकारी

 

आ. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे भाजपचे तत्कालीन आ. प्रशांत परिचारक यांच्या मदतीने निवडून आले होते. मात्र कारखान्याच्या या निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वारदेकर, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष तानाजी तालुका सरचिटणीस दिगंबर भाकरे, जिल्हा सरचिटणीस गोडप्पा बिराजदार, कार्यकारणी सदस्य महादेव लुगडे आदींनी समाधान आवताडे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. त्यांना परिचारक गटाची साथ मिळाली. त्यामुळे भाजपच्या आमदारांचा भाजपच्याच पदाधिका-यांकडून पराभव झाला आहे.

□ संस्था मतदार संघातून सिद्धेश्वर आवताडे विजयी

 

संस्था मतदारसंघातून सिद्धेश्वर अवताडे तब्बल 145 मतांनी विजयी झाले. संस्था मतदारसंघात बबनराव आवताडे यांचा दबदबा कायम राहिला. कारखान्याच्या सुरुवातीमधील काळ वगळता आतापर्यंत या मतदारसंघातून बबनराव आवताडे हे या प्रवर्गातून कायम संचालक राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत बबनराव आवताडे हे संस्था मतदारसंघातून माघार घेत त्यांनी या जागेवर त्यांचे पुत्र खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांना संधी दिली.

नवखे असलेले सिद्धेश्वर अवताडे यांनी या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.या मतदारसंघात 160 मते होती त्यापैकी 154 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये 149 मध्ये सिद्धेश्वर आवताडे यांना मिळाली तर त्यांचे विरोधी जगन्नाथ रेवे यांना फक्त चार मते मिळाले.

समविचारी गटातून भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शहराध्यक्ष गोपाळ भगरे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडापा बिराजदार,तालुका सरचिटणीस दिगंबर भाकरे हे तिसऱ्या फेरीत देखील आघाडीवर होते.

□ नियोजनबद्ध मतमोजणी

 

प्रशासनाने दामाजी कारखान्याचे निवडणुकीचे मतमोजणी व निवडणूक प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पाडली.24 हजार 521 मताची चार फेरीत नियोजनबद्ध मतमोजणी झाली. वेळेत निकाल देण्यामध्ये प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर तहसीलदार स्वप्निल रावडे, सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील,नायब तहसीलदार पंकज राठोड,सुधाकर धाईजे यांच्यासह अन्य कर्मचारी प्रयत्न केले तर मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने,सपोनि बापूसाहेब पिंगळे,अमोल बामणे,उपनिरीक्षक सौरभ शेटे, सत्यजित आवटे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

 

 

□ मतमोजणीच्या तिसर्‍या फेरीअखेर समविचारी गटाचे विमान सुसाट

मतमोजणीच्या तिसर्‍या फेरीत अखेर विमान हे चिन्ह विजयाच्या वाटचालीकडे होते. दरम्यान रात्री उशीरा तिसरी फेरी संपली असून चौथी फेरी मतदान मोजणी बाकी राहिली होती. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी सत्ताधारी व समविचारी गटात अत्यंत चुरशीने म्हणजेच 85 टक्के इतके मतदान झाले होते.

काल गुरुवारी सकाळी 8.00 वाजलेपासून मतमोजणीत शासकिय गोडाऊनमध्ये प्रारंभ झाला. दरम्यान मतमोजणीच्या प्रारंभापासूनच समविचारी गटाचे विमान हे चिन्ह झेप घेत तिसर्‍या फेरीअखेर ते झेप घेतच राहिले. विमान चिन्हाच्या झेप घेण्यामुळे कपबशी चिन्हाच्या गटाला मोठा हादरा बसला असून हा गट मतमोजणी केंद्राकडे फिरकल्याचेही दिसून आले नाही.

सकाळी 8.00 वा. मतमोजणीस प्रारंभ होण्यापुर्वीच पावसाने हजेरी लावल्याने मतदान केंद्र परिसरात शुकशुकाट जाणवत होता. दुपारी 3.00 नंतर थोड्याशा प्रमाणात पाऊस थांबल्यानंतर समविचारी गटाचे उमेदवार व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. रात्री श्री संत दामाजीच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या गटाने आशीर्वादही घेतले.

 

□ गटनिहाय उमेदवारास तिसर्‍या फेरीअखेर पडलेली मते

 

– मंगळवेढा गट –

निला अटकळे- 7830,आ.तथा चेअरमन समाधान आवताडे- 8255,दिलीप जाधव -197, मुरलीधर दत्तू -9152,गौरीशंकर बुरकूल – 9750,गोपाळ भगरे -9604,मारुती वाकडे -50,राजेंद्र सुरवसे -7165,वैध मते -52703 अवैध मते -907.

– ब्रम्हपुरी गट

सचिन चौगुले -8034, राजेंद्र चरणू पाटील -10105, राजेंद्र सर्जेराव पाटील -7989, भारत बेदरे -9719, अशोक भिंगे -7724, दयानंद सोनगे -9551 वैध मते -53115, अवैध मते -734.

– मरवडे गट

प्रदिप खांडेकर -8254,गणेश पाटील -7266,बसवेश्‍वर पाटील -7716,शिवानंद पाटील -10277,रेवणसिध्द लिगाडे -9663,औदुंबर वाडदेकर -9702,वैध मते -53578,अवैध मते -680.

– भोसे गट

उमाशंकर कनशेट्टी -8064,अंबादास कुलकर्णी -8020,भिवा दोलतोडे -9988,बसवराज पाटील -10014,गौडाप्पा बिराजदार -9692,आबा बंडगर -7751,वैध मते -53729,अवैध मते -665.

– आंधळगांव गट

नवनाथ आसबे -79,प्रकाश पाटील -10091,दिगंबर भाकरे -9868,सुरेश भाकरे -8117,विनायक यादव -7849,महादेव लुगडे -9599,बाळासाहेब शिंदे -7751 वैध मते -53254,अवैध मते -653.

– महिला राखीव गट

संगिता कट्टे -54,निर्मला काकडे -10127,लता कोळेकर -9821,कविता खडतरे -48,कविता निकम 7896,स्मिता म्हमाणे -7595.वैध मते -35541,अवैध मते -767.

– अनुसूचित जाती जमाती गट

तानाजी कांबळे -10014, सदाशिव डांगे -41,युवराज शिंदे -8155,वैध मते -11210,अवैध मते -558.

– भटक्या विमुक्त जाती गट

तानाजी खरात -10404,विजय माने -7229,वैध मते -18333,अवैध मते-434.

– सहकारी संस्था गट सिध्देश्‍वर आवताडे – 149 विजय

– इतर मागास प्रवर्गातून अशोक केदार हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

TAGGED: #president #Damaji #sugarfactory #recipe #defeat #BJPMLA #defeated #byBJPmembers #themselves, #दामाजी #साखर #कारखाना #अध्यक्ष #समाधानआवताडे #पराभव #उतारा #भाजप #आमदार #भाजपवाल्यांनी #पराभव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेत्री सुश्मिता सेनबरोबर डेट; ललित मोदीचा खुलासा, लवकरच करणार लग्न
Next Article देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, केले औक्षण करून स्वागत

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?