मुंबई : शिंदे सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. विद्यमान सरकारच्या मते अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय घेणे अयोग्य आहे. ज्या सरकारकडे बहुमत ते सरकार निर्णयांना मंजुरी देईल. औरंगाबादचं संभाजीनगर होणारच असं फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. यामुळे मविआने घेतलेला निर्णय बेकायदेशीर होता, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे. decision taken by Mavia illegal; Not Sambhajinagar but Chhatrapati Sambhajinagar cabinet meeting
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. तसेच उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडीने चुकीच्या पध्दतीने नामांतर केल्याने शिंदे- भाजप सरकारने निर्णयाला स्थगिती दिली होती. या नामांतराच्या निर्णयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांतर निर्णयावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आलं होतं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/583024976708569/
दुसऱ्या बैठकीत हा निर्णय शिंदे सरकारने रद्द केला होता. परंतु नामांतराचा निर्णय या बैठकीत पुन्हा एकदा घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंबादमधील शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं. याबाबत कायदा करून ठराव तयार करावा लागतो. त्यानुसार औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे. येत्या अधिवेशनात नामांतराबाबत ठराव मांडून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकारने आमच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. परंतु टीकेनंतर त्यांना हा निर्णय पुन्हा घ्यावा लागला आहे. १९८८ पासून आम्ही नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. आता या निर्णयानंतर शिंदे सरकारनं केंद्रातून लवकर मंजुरी आणावी. तोपर्यंत आम्ही कोणताही आनंद साजरा करणार नाही. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतरच आमचा जल्लोष असेल. त्यामुळे सरकारने एका महिन्यात केंद्रातून मंजुरी मिळावी, अन्यथा फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
□ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली.
– औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय
– कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून नामकरणाला स्थगिती दिली होती.
– उस्मानाबाद शहराचं नाव धाराशीव करण्याचा निर्णय
– नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देणार
https://www.facebook.com/109399567404448/posts/582934726717594/