Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमळनेरकडे जाणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

अमळनेरकडे जाणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 ठार

Surajya Digital
Last updated: 2022/07/18 at 1:16 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

इंदोर : मध्य प्रदेशातील इंदोरवरुन अमळनेरकडे येणारी ST बस धार जिल्ह्यातील नर्मदा नदीत कोसळली आहे. यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 15 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. बसमध्ये एकुण 55 प्रवाशी होते. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. पुलाचे रेलिंग तोडून बस थेट नदीत कोसळली. Madhya Pradesh Indore Amalner bound bus plunges into Narmada river, 13 killed

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ बस अपघात एसटी महामंडळाची प्रतिक्रिया□ इंदोरवरुन येणाऱ्या बसला अपघात, मदतकार्य सुरु□ महाराष्ट्रात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर येथून पुण्याला जाणाऱ्या या बसच्या चालकाचे खलघाट संजय सेतू पुलावर वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट नदीत जाऊन कोसळल्याची माहिती आहे.

इंदोरवरुन अमळनेरकडे ST बस मध्य प्रदेशातील नर्मदा नदीत कोसळली आहे. धार जिल्ह्यातील खलघाट येथे प्रवाशांनी भरलेली बस पुलाचे रेलिंग तोडून नर्मदा नदीत पडली. बस पूर्णपणे पाण्यात बुडाली होती, घटनेनंतर घाटावरील लोक आणि नदीतून बोट घेऊन जाणाऱ्या नाविकांनी तात्काळ बसजवळ जाऊन प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

मध्य प्रदेशात सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडलीयं. 55 प्रवाशांसह बस खरगोन आणि धार जिल्ह्यांच्या सीमेवर नर्मदा नदीत पडली. हा अपघात खलघाटात बांधण्यात आलेल्या नर्मदा पुलाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रवासी बस इंदूरहून अमळनेरला जात होती. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. खरगोन-धार डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू आहे.

खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यांनी वृत्तवाहिनीशी सांगितले की, 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बचावलेल्या लोकांनी सांगितले की, पुलाचे रेलिंग तोडून बस थेट नदीत न पडता दगडांवर पडली, त्यानंतर ती ओसंडून वाहणाऱ्या नदीत उलटली. बसमध्ये जवळपास 55 लोक होते. घटनास्थळी बचावकार्य राबवत असलेल्या बचाव दलाने बसमध्ये अडकलेल्या आणि नदीत बुडालेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर अमळनेर बस क्रमांक एम. एच. 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेरकडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असुन 1 जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करणेत येवुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत, त्यांचे प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

□ बस अपघात एसटी महामंडळाची प्रतिक्रिया

 

– इंदोरवरून अंमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली. पुलाचे रेलिंग तोडून बस थेट नदीत

– एसटी महामंडळाची ही बस जळगाव जिल्ह्यातील होती.

– सकाळी साडेसात वाजता ही बस इंदौरहून निघाली होती. – ही बस अंमळनेरला येणार होती.

– सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने  022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित

– एकूण 55 प्रवासी होते, 13 जणांचा मृत्यू

– हेल्पलाईन क्रमांक : घटनास्थळी मदतीसाठी 09555899091.

– जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष  02572223180, 02572217193

□ इंदोरवरुन येणाऱ्या बसला अपघात, मदतकार्य सुरु

 

– मध्य प्रदेशातील इंदोरवरून अंमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली

– बचाव कार्य सुरु, एनडीआरएफ व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी

– बसचा नंबर MH 40N9848

– 6 जणांना वाचवण्यात यश, 13 जणांचा मृत्यू

– सकाळी साडेदहा वाजताची घटना

– खलघाट येथील संजय सेतू येथे अपघात झाला.

□ महाराष्ट्रात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

देशात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, हिमाचल आणि जम्मूसह देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 99 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील वारंगल, पेडापल्लीकाई आणि भद्राद्री – कोथागुडेम जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सुमारे 20 हजार लोकांची सुटका करून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #MadhyaPradesh #Indore #Amalner #bound #bus #plunges #Narmadariver #13killed, #इंदोर #अमळनेर #मध्यप्रदेश # बस #नर्मदानदी #कोसळली #13ठार #बेपत्ता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, अन्यथा बंडखोर आमदार ठरू शकतात अपात्र
Next Article पंढरपुरातील आश्रम शाळेत 43 मुलांना विषबाधा; कारवाई होणार, वाचा मुलांची नावे

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?