नवी दिल्ली : अखेर शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर ते लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनाही भेटले. यावेळी त्यांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेतील गटनेते आणि भावना गवळी यांची प्रतोदपदी यांची निवड करावी, अशी मागणी करणारे पत्र दिले आहे. शिंदे यांनी खासदारांनाही आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. Big success for Chief Minister Eknath Shinde, went to Delhi and defeated 12 MPs of Shiv Sena
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत शिंदे यांनी सुरुवातीला राहुल शेवाळे यांचा गटनेते आणि भावना गवळी यांना प्रतोद म्हणून उल्लेख केला. शिवसेनेचा गट स्थापन करण्याबाबतचं पत्र या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार आहेत.
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे आणि प्रतोद भावना गवळी, खासदार कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे (एकनाथ शिंदे यांचा मुलगा) अशी शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांची नावं आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/585148516496215/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/585120913165642/
शिवसेनेतील बंडखोर खासदारांकडून आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने बदल सुचवले आहेत. त्यामुळे आता हे पत्र आज संध्याकाळी अथवा उद्या लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बाजूला सारुन एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सध्या खूप चर्चा सुरु आहे पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जी भूमिका 50 आमदारांनी घेतली त्याला राज्यभरातून स्वागत केलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने त्याचं समर्थन केलं आहे. कारण आम्ही एकत्र लढलो होतो. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवं होतं ते, आता झालं, जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकहिताचे निर्णय आमचं सरकार घेतंय, केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारला पाठिंबा मिळतोय. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र काम करतं तेव्हा त्या राज्याचा विकास आणि उत्कर्ष होत असतो. त्यामुळे आपण पंतप्रधानांना धन्यवाद देत असल्याचे म्हटले.
लाखो मतांनी निवडून येणाऱ्या खासदारांनीही या भूमिकेचं स्वागत केलं आहे. या महाराष्ट्रात लोकांसाठी जे चांगलं काम करता येईल त्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. आपण दिल्लीत येण्याचं दुसरं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाची उद्या सुप्रीम कोर्टात केस आहे त्यासंदर्भात वकिल, तज्ज्ञांशी चर्चा केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
□ राहुल शेवाळे यांनी फोडला बॉम्ब, केला मोठा गौप्यस्फोट
खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाली होती आणि मलाही युती करायची होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. तसेच युतीबाबत उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली होती, असेही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही भाजपबरोबर जात आहोत, असं त्यांनी म्हटलं.
https://www.facebook.com/109399567404448/posts/585218646489202/