सोलापूर : महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी परिवहन विभागाची ऑडिट बैठक घेतली. यामध्ये सन 2015-16 मधील 11 हजार लिटर डिझेलचा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक श्रीकांत मॅकलवार यांच्यासह 15 ते 16 जणांना नोटिसा दिल्या आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. Scam of 11 thousand liters of diesel in transport activities; Erase a void with whitener
महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी नुकतीच परिवहन विभागाची ऑडिट संदर्भात बैठक घेतली. यामध्ये 25 मुद्द्यांवर ऑब्जेक्शन नोंदवण्यात आले. यामध्ये 2015- 16 साली 11हजार लिटर डिझेल गायब झाल्याचे आढळून आले आहे.
तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांने डिझेलची नोंदणी करताना व्हाइटनर च्या साह्याने एक शून्य खोडल्याचे दिसून आले. याप्रकरणी आयुक्तांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मॅकलवार यांच्यासह वरिष्ठ आणि कनिष्ठ मिळून तब्बल 16 जणांना कारणे दाखवा नोटीस दिले आहेत.
त्यांचे उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केले. याशिवाय ज्या 25 ऑडिटवर ऑब्जेक्शन आलेले आहे अशांचीही चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे.
■ व्हाइटनरच्या साह्याने एक शून्य खोडला
तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांने डिझेलची नोंदणी करताना व्हाइटनर च्या साह्याने एक शून्य खोडल्याचे दिसून आले. याप्रकरणी आयुक्तांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मॅकलवार यांच्यासह वरिष्ठ आणि कनिष्ठ मिळून तब्बल १६ जणांना कारणे दाखवा नोटीस दिले आहेत. त्यांचे उत्तर आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/585949029749497/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ नदीत वाहून एकाचा मृत्यू, नदीवर पूल बांधण्यासाठी ठिय्या आंदोलन
सोलापूर : हरणा नदीमध्ये मुस्ती येथील एक ग्रामस्थ पाण्यात होऊन गेला आणि त्याचा मृत्यू झाला त्या निषेधार्थ नदीवर पूल बांधण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मंगळवारी ( ता. 19 जुलै) रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निषेध नोंदवला.
मयत शौकत रशीद नदाफ (वय ३८ रा. बेघरवस्ती मुस्ती, ता.दक्षिण सोलापूर) हे रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुस्ती येथील चुलत्याच्या हॉटेलातील काम आटपून पायी नदीच्या पलीकडे घराकडे निघाले होते. हरणा नदीतील पाण्याच्या प्रवाहात ते वाहत गेले.
हा प्रकार सकाळी समजल्यानंतर गावातील लोकांनी मृतदेहाचा शोध घेतला. मात्र मृतदेह आढळले नाही. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास शौकत नदाफ यांचा मृतदेह हरणा नदीच्या बंधाऱ्याजवळ आढळून आला. मयत शौकत नदाफ यांच्या पश्चातत आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली.
नदीवर पूल नसल्याने नदीत बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. केवळ नदीवर ब्रिज नसल्याने नदाफ यांचा मृत्यू झाल्याने मृत्यू गावचे नागरिक चांगले संतापले असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती तथा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भीमाशंकर जमादार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करीत अधिकाऱ्यांचा रस्ता अडवला. प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी दिली. मात्र शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत या सर्व आंदोलकांना उठवून प्रशासनाला निवेदन देण्यास भाग पाडले.
□ नदाफ कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती या गावात नदी ओलांडून जावे लागते. या ठिकाणी ब्रिज सुद्धा नाही. मुस्ती गावापासून 100 मीटर अंतरावर हरणा नदी आहे. मुस्ती वरून अरळीकडे जाण्यासाठी मार्ग नाही नदीतून जावे लागते. त्यामुळे अनेकांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या शौकत नदाफ यांच्या कुटुंबियांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच तातडीने नदीवरील ब्रिज बांधण्याची परवानगी द्यावी अन्यथा आम्ही इथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/585918616419205/