Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे

Surajya Digital
Last updated: 2022/07/21 at 7:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ थकित बिले दिल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही

 

Contents
□ थकित बिले दिल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाहीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ महिला म्हणून मिळालेल्या पदाला न्याय देणार□ श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपला विश्वास सार्थ

पंढरपूर :– विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील तर उपाध्यक्षपदी प्रेमलता रोंगे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भालके यांच्या 20 वर्षाच्या साम्राज्याला अभिजित पाटलांनी सुरुंग लावत एकतर्फी विजय संपादन केला आहे. Abhijit Patil as the President of Vitthal sugar Factory and Premlata Ronge as the Vice President

 

आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत नूतन संचालक मंडळाची सभा पार पडली. अध्यक्ष पदासाठी अभिजित पाटील आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रेमलता रोंगे यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

 

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिला संचालक प्रेमलता रोंगे यांना उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 109 कोटी रुपये वसूल करण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काहींना पकड वॉरंट काढण्यासाठी कोर्टाला विनंती करणार आहे. 138 च्या केसेस करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकण्यात येणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शेतकऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासूनचे थकीत बिल दिल्याशिवाय जाहीर सत्कार स्वीकारणार नाही. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून 2500 रुपये दर देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक मंडळ आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

□ महिला म्हणून मिळालेल्या पदाला न्याय देणार

 

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि डॉ बी. पी. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मला कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संधी मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. येत्या काळात कारखाना काटकसरीने चालवण्यासाठी माझे प्रयत्न असतील. महिला सभासदांची संख्या मोठी असल्याने त्यासाठी नक्कीच भरीव असे काम करीन, असे सौ प्रेमलता रोंगे यांनी म्हटले.

□ श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपला विश्वास सार्थ

 

श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अभिजीत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या निवडीनंतर सोशल माध्यमाने मधून आपल्या भावना व्यक्त केले आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या “चेअरमन” पदाची एकमुखी सर्वांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी शिरोधार्य करून शेतकरी सभासद बांधवांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे.  श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी अविरत प्रयत्न करेल. सर्वांच्या पाठबळाबद्दल मनःपूर्वक आभारी असल्याचे नूतन अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.

 

You Might Also Like

सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात

सोलापूर विद्यापीठाची परीक्षा १४ ऑक्टोबरपासून!

सोलापूरमधील व्यापार्‍याची दोन लाख 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

सोलापूर – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सीओईपीतील नव्या इमारतीचे उद्घाटन

सोलापुरात रेशनच्या तांदूळमध्ये आढळला मृत साप

TAGGED: #AbhijitPatil #President #Vitthal #Sugar #Factory #PremlataRonge #VicePresident, #विठ्ठल #साखर #कारखाना #अध्यक्षपदी #अभिजितपाटील #उपाध्यक्षपदी #प्रेमलतारोंगे #सत्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी – सुप्रीम कोर्ट
Next Article घोषणा- द्रौपदी मुर्मू देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?