विरवडे बु : वटवटे (ता. मोहोळ) येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांच्या कारवाईत 4.13 किलो वजनाचे गांजासह एकूण 4 लाख 41 हजार 300 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. Cultivation of ganja in sugarcane fields in Solapur, farmers in possession of Batwate Mohol
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि अनिल सनगल्ले यांचे विशेष पथक नेमूण सदर पथकास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे वटवटे (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथील शेतकरी सदाशिव दत्तू ढोबळे (वय.62) यांनी आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृष्य वनस्पतीची लागवड केले असलेबाबत माहिती मिळाली.
मिळालेल्या बातमी प्रमाणे कारवाई करण्याकरिता वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कारवाई करणेकामी कामती पोलीस ठाणे येथे जावून तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने व कामती पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांची मदत घेवून घटनास्थळी दाखल झाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587146682963065/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नायब तहसिलदार लिना खरात, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा असे वाहनासह जावून बातमीप्रमाणे शेतातील ऊसामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार यांचेसह पाहणी केली. शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी लहान मोठी गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यावरून मिळून आलेली झाडे ही गांजा सदृश्य वनस्पती असल्याचे खात्री झाल्याने सदरची झाडे मुळासह उपटून काढले.
वजन केले असता 45.130 किलो वजनाचे 4,41,300 रू. किंमतीचे गांजा सदृश्य वनस्पती मिळून आले. अंमली पदार्थ गुन्ह्याचेकामी कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. सदरबाबत कामती पोलीस ठाणे येथे गुरंन 195/2022, अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचा तपास कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली कामती पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, कामती पोलीस ठाणेचे बापूसाहेब दुधे, चंद्रकांत कदम, सचिन जाधवर, अमोल नायकोडे, परमेश्वर जाधव, भरत चोधार यांनी बजावली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587229306288136/