Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना फुटीचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच; हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही : राज ठाकरे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना फुटीचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच; हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही : राज ठाकरे

Surajya Digital
Last updated: 2022/07/23 at 9:47 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : शिवसेना ही देवेंद्र फडणवीस, अमित शहा किंवा भाजपने फोडली नसून याला सर्वस्वी उध्दव ठाकरे जबाबदार आहेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितले. ‘हे पहिल्यांदा घडले नाही, आधी मी बाहेर पडलो, आता आमदार बाहेर पडले, तेव्हाही हेच कारण होते, याचे श्रेय तुम्हाला उध्दव ठाकरेंनाच द्यावे लागेल, बाळासाहेब असताना अशी बंडखोरी झाली नसती’, असे राज ठाकरे म्हणाले. Credit for Shiv Sena split goes to Uddhav Thackeray; This man is not to be trusted: Raj Thackeray Balasaheb legacy

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● ईडी चौकशीवरुन टीका करणा-यांना प्रत्युत्तर□ चाळीस आमदाराचे मनसेत विलीनीकरणाचा सकारात्मक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, असं राज यांनी उद्धव यांना उद्देशून म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी मुलाखती दरम्यान त्यांनी ही टीका केलीय.

भाजपशी मनसेची युती होईल किंवा होणार नाही. पण यापूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंना किंवा त्यांनी तुम्हाला कधी टाळी देण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं त्याचं विश्वास ठेवण्यासारखं नाही काही. इतर लोकांचं मला वाईट वाटतं पण हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही”

आत्ताच्या शिवसेनेत मराठीच्या बाबतीत काहीच नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबतच त्या सर्व गोष्टी गेल्या. रझा अकादमीनं जेव्हा मुंबईत धुडगूस घातला होता. पाकिस्तानी कलाकारांना आम्ही हाकलून दिलं होतं. आत्ता भोंग्यांचा विषयही आम्हीच बंद केला. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा मी चालवतोय असं मला वाटतं, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● ईडी चौकशीवरुन टीका करणा-यांना प्रत्युत्तर

राज ठाकरे यांची ईडीने 2019 मध्ये तब्बल नऊ तास चौकशी केली होती. आयएल अ‍ॅण्ड एफएस या खासगी वित्तीय पायाभूत संस्थेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार, अनियमिततेत ठाकरे यांचा सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी ईडीने त्यांना नोटीस बजावली होती.

ईडी चौकशीवरुन टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ईडी चौकशी आणि भाजपचा काय संबंध? मी त्या दिवशी ठाण्याच्या सभेत बोललो होतो ज्यावेळेला टीका करायची त्या वेळेला टीका करणार. पण समजा जर तिकडे काश्मीरमध्ये 370 कलम जर रद्द झालं तर त्यांचं अभिनंदन नाही करायचं का? त्यावर तुम्ही म्हणणार मी तिकडे गेलो? शरद पवारांशी जरा दोन शब्द बोललो की पवारांसोबत युती होते का? भाजपबाबत बोललो की भाजपसोबत युती होते का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला बारामतीला आले तेव्हा शरदजी की उंगली पकडके मैं राजनिती मे आया असं ते म्हणाले होते. म्हणजे काय लगेच पवार आणि मोदी यांची युती झाली का? असेही राज ठाकरे म्हणाले.

□ चाळीस आमदाराचे मनसेत विलीनीकरणाचा सकारात्मक

 

मुलाखतीत बोलताना चाळीस आमदारांच्या मनसेत विलिनीकरणाबाबतही त्यांनी त्यांचं मत मांडलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये मनसेमध्ये हे जे 40 आमदार आहेत ते विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून कायदेशीर पातळीवर हे आमदार गट म्हणून स्थापित होतील. ते पक्षात विलीन होतील. प्रस्ताव आला तर या 40 आमदारांना स्वीकाराल? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे. शेवटी हे माझ्याबरोबर जुने काम केलेले लोक आहेत पूर्वीचे. हा झाला सगळा टेक्निकल भाग. तुम्ही बोलताय तशा बातम्या मीही ऐकल्या आहेत. टेक्निकल मला काही फार माहिती नाही. समजा त्यांच्याकडून अशा प्रकारची काही गोष्ट आली तर नक्की विचार करेन, असं आवर्जून राज ठाकरे म्हणाले.

हिंदुत्व किंबहुना वारसा हा पिढ्यानपिढा येत नाही वारसा हा विचारांचा हवा पिढ्यान्नपिढ्या वारसा आला की तो संपत जातो. आणि तीच वेळ आता शिवसेना किंबहुना उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. यामुळे बाळासाहेबांचा खरा वारसा मीच चालवतोय असा दावा राज ठाकरे यांनी एका प्रसार माध्यमाच्या मुलाखतीमध्ये केला.

 

 

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Credit #ShivSena #split #UddhavThackeray #Thisman #trusted #RajThackeray #Balasaheb #legacy, #शिवसेना #फुटीचे #श्रेय #उद्धवठाकरे #माणूस #विश्वास #राजठाकरे #बाळासाहेब #वारसा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दगड छातीवर ठेवला की डोक्यावर; शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया
Next Article पोलिसाच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?