चंद्रपूर : राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली आहे. कोरोना संकट वाढत असले तरी एका एसटी बस मध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.
कोविडचे सर्व नियम पाळून राज्यात एसटी सेवा सुरू करणार येणार असून एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरू करण्याची तयारीही सरकार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. खरंतर, राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सगळंकाही बंद होतं. पण आता राज्यात व्यापार आणि ऑफिसं बऱ्यापैकी सुरू करण्यात आली आहेत. राज्य अनलॉक होताच पहिल्या टप्प्यात कोरोनाचा आकडा वाढलेला पाहायला मिळाला.
* पाच डॉक्टरांना नोटिसा
पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. प्रसंगी मेस्मा लावला जाणार आहे. चंद्रपूर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 डॉक्टरांना याचसाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.