पंढरपूर :– कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणत शेतामध्ये विठ्ठल पाहिलेल्या संत सावतामाळींच्या भेटीला आज साक्षात परमात्मा विठ्ठल अरणकडे निघाले. आषाढीच्या सोहळ्यानंतर विठ्ठलाच्या पादुका प्रतिवर्षी माढा तालुक्यातील अरण या ठिकाणी परंपरेप्रमाणे जातात. या सोहळ्याला 205 वर्षाची परंपरा आहे. 205 year old tradition: Pandharpur Aran, Saint Sawta Mali who went to meet Shri Vitthal
आषाढ शुद्ध एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आदी प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात येतात. यावेळी पंढरीच्या चंद्रभागेच्या तीरावर टाळावृदंगाच्या गजरात एकादशीचा अनुपम्य सोहळा घडतो. मात्र या सोहळ्याला पंढरपूर पासून नजीकच असणारे संत सावतामाळी कधीच हजर राहिले नाहीत. त्यांनी शेतीमध्ये आणि आपल्या पिकांमध्ये विठ्ठलाला पाहिले. आणि तेथेच ते शेती करत राहिले.
यामुळे आषाढ महिन्यातीलच वद्य एकादशीनंतर साक्षात श्री विठ्ठल भगवान सावता माळींच्या भेटीला गेले असल्याची आख्यायिका रुढ आहे. याप्रमाणे प्रतिवर्षी येथील काशीकापडी समाजाच्या मठातून पांडुरंगाच्या तालुका विठ्ठल मंदिरामध्ये जातात. यानंतर नगरपदक्षणा होते. आणि अरणकडे या पादुका मृदंगाच्या गजरात दिंडीने प्रस्थान करतात.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588395182838215/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/588416736169393/
आषाढी एकादशीच्या अगोदर संताच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होतात. परंतु अपवाद फक्त संत शिरोमणी सावता माळी यांची पालखी येत नाही तर आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी अरण येथे संत सावता माळी यांच्या हे विशेष म्हणावे लागेल. आज सकाळी काशी कापडी समाजाच्या मठातून हजारो भाविक भक्तांच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवून प्रस्थान करण्यात आले.
विठ्ठल मंदिरातुन मानकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेऊन, विधिवत पूजा करण्यात आली. या पादुकांमध्ये विठलाचा वास येतो असे सांगितले जाते. यानंतर पादुका पालखीत ठेवून अरण कडे प्रस्थान झाले. तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचून संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते.
तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचल्यावर संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. अमावस्ये दिवशी काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते.
यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, पंढरपूर काशी कापडी समाजाचे मानकरी नागेश गंगेकर, अरण ट्रस्टचे सचिव ऍड.विजय शिंदे, सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश संघटक साधना राऊत, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब माळी, माढा तालुकाध्यक्ष डॉ.भारत कुबेर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे, सावता जाधव आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588480056163061/